महत्वाच्या बातम्या

 शेतकऱ्यांनी कृषी विभागाच्या विविध योजनांचा लाभ घ्यावा : कृषी विभागाचे आवाहन


विदर्भ न्यूज एक्सप्रेस

प्रतिनिधी / खांबाडा : बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन (स्मार्ट) या योजने अंतर्गत १८ जानेवारीला कृषकोन्नती कृषी विकास आदिवासी शेतकरी उत्पादक कंपनी टेमुर्डा ता. वरोरा यांची कृषी विभागामार्फत सभा घेण्यात आली. कृषी अन्नप्रक्रिया करून उद्योजक होण्याची संधी आणि फलोत्पादन मधून आर्थिक उन्नतीची वाट धरण्याकरिता कु. प्रगती चव्हाण कृषी मंडळ अधिकारी टेमुर्डा यांनी शेतकऱ्यांचे प्रबोधन केले. कृषी विभागाच्या विविध योजना, राष्ट्रीय कृषी विकास कार्यक्रम तसेच आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्षाच्या निमित्याने पौष्टिक तृणधान्याचे महत्त्व पटवून सुदृढ समाज निर्माण करण्याविषयी लोखंडे कृषी पर्यवेक्षक यांनी मार्गदर्शन केले. सूक्ष्म सिंचन, कृषी यांत्रिकीकरण इत्यादी योजनेचा लाभ घेऊन शेतकऱ्यांच्या उत्पादकतेत वाढ करण्याकरिता व महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करण्याची सविस्तर प्रक्रिया याविषयी डोंगरकार कृषी पर्यवेक्षक यांनी समंबोधन केले. विविध पिक प्रात्यक्षिके, स्वयंरोजगार प्रशिक्षण इत्यादी विषयी मिनल आसेकर, बीटीएम यांनी शेतकऱ्यांना माहिती दिले. कृष्णकोन्नतीचे संचालक बंडू ठाकरे यांनी स्मार्ट अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या योजनांचा लाभ घेऊन सर्वांनी एकत्रित येऊन आर्थिक उन्नती साधावी, असे आवाहन उपस्थित सर्व सभासद व शेतकरी बंधूंना केले. कृष्णकोन्नतीचे अध्यक्ष मरस्कोल्हे सभेमध्ये कृषी विभागाच्या विविध योजनेविषयी माहिती दिले. सदर सभेस कु. प्रगती चव्हाण मंडळ कृषी अधिकारी टेमूर्डा, पी. एस. लोखंडे कृषी परिमूरडा, के.पी. डोंगरकर कृषी पर्यवेक्षक टेमूर्डा, कु. मीनल आसेकर BTM, यांनी यामध्ये PMFME, PMKSY, कृषि यांत्रिकीकरण, NFSM, आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष २०२३ निमित्य पौष्टिक तृण धान्य यांचे महत्व सांगितले. तसेच बंडू डाखरे FPO संचालक, जगदीश मरस्कोल्हे, खापणे, तसेच सर्व संचालक व सभासद व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.





  Print






News - Gadchiroli




Related Photos