पाकिस्तान संघाचा फलंदाज आणि कर्णधार बाबर आझम लवकरच अडकणार लग्न बंधनात : बहिणीशीच केला साखरपुडा


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
वृत्तसंस्था / इस्लामाबाद :
पाकिस्तान संघाचा फलंदाज आणि कर्णधार बाबर आझम लवकरच त्याच्या आयुष्यातील दुसऱ्या डावाची सुरुवात करणार आहे. एका वृत्तानुसार, बाबर आझम पुढील वर्षी लग्नाच्या बेडीत अडकणार आहे. बाबर आझमने आपल्याच बहिणीशी साखपुडा केला आहे. या वृत्तात तो पुढील वर्षी लग्न करणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. असे असले तरी बाबर आझम याने याबाबत अधिकृत माहिती अद्याप जाहीर केलेली नाही आहे. मात्र लवकरच तो याबाबत माहिती जाहीर करू शकतो.
पाकिस्तानी वृत्तानुसार, बाबर आझम आपल्या चुलत बहिणीशी लग्न करणार आहे. अलीकडेच पाकिस्तान संघाचा माजी कर्णधार अझर अली याने ट्विटरवर चाहत्यांच्या प्रश्नांची उत्तरे देताना बाबर आझमच्या लग्नाबद्दल भाष्य केले होते. एका चाहत्याने अझर अलीला विचारले होते की, बाबर आझमला तुम्हाला काय सल्ला द्यावासा वाटतो. ज्याचे उत्तर देताना तो म्हणाला होता की, बाबरने आता लग्न केले पाहिजे.
बाबर आझमच्या साखरपुड्याची बातमी पाकिस्तानच्या संपूर्ण टीमला माहिती असल्याचे बोलले जात आहे. मात्र अधिकृत घोषणा होईपर्यंत कोणीही याबाबत बोलत नाही आहे. दरम्यान साखपुड्यानंतर बाबर आझम पीएसएलच्या सहाव्या हंगामासाठी युएईला रवाना होणार आहे.
  Print


News - World | Posted : 2021-06-03


Related Photos