थकबाकीदाराविरोधात महावितरणची मेाहिम ४८४ ग्राहकांचा वीजपुरवठा थकबाकीमुळे खंडित


- कृषिपंपांची थकबाकी ९४ कोटी ५० लाख
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / चंद्रपूर : महावितरणच्या चंद्रपूर परिमंडळात थकबाकीदारांविरोधात धडक मोहिम राबविण्यात येत असून ग्राहकांनी वीजबिल वेळेत भरून महावितरणला सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. आतापर्यंत ५ हजार च्या वर वीजबिल असलेल्या ४८४ ग्राहकांचा वीजपुरवठा थकबाकीमुळे तात्पुरता किंवा कायमचा खंडित करण्यात आला आहे. तसेच ५ हजार च्या खली वीजबिल असलेल्या शेकडो ग्राहकांचा वीजपुरवठा ख्ंडीत करण्यात आला.
एकीकडे वीजबिल हाती आल्याबरोबर वीजबिलाचा भरणा करणारे ग्राहक तर दुसरीकडे थकबाकीदार अशा दुहेरीत महावितरण सापडली आहे. विकल्या गेलेल्या वीजेच्च्या प्रत्येक युनिटची बिजबिलाच्या माध्यमातून वसुली करून परत वीज विकत घेवून ग्राहकांना वीजपुरवठा करण्याची जवाबदारी पार पाडतांना थकबाकीदरामुळे महावितरणला अडचणीचा सामना करावा लागत आहे. महावितरणच्या चंद्रपूर परिमंडळात घरगुती ग्राहकांकडे थकबाकी १८ कोटी ४२ लाखांच्या घरात पोहोचली आहे तर वाणिज्यिक गाहकांकडे ५ कोटी ६८ लाख झाली आहे. औदयोगिक ग्राहकाकडे ६१ लाख थकबाकी जमा झाली आहे. कृषी पंधारकांकडे थकबाकी ९४ कोटी ५० लाखाच्या घरात पोहेाचली आहे.
चंद्रपूर व गडचिरोली ग्रामिण व शहरी पाणीपुरवठा येाजणा ९७ लाख तर ग्रामिण व शहरी पथदिव्यांची थकबाकी २२५ कोटी १७ लाख झाली आहे. महावितरणचा कारभार सुरळीत चालण्याकरिता ग्राहकांनी वापरलेल्या प्रत्येक विजेच्या युनिटची वसुली होणे गरजेचे आहे. वीजग्राहकांकडून वीजबिल विहित मुदतीत वसुल करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. सोबतच वसुलीत निश्काळजीपणा बाळगणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाईचे निर्देश देण्यात आले आहेत.
सर्व थकबाकीदार ग्राहकांनी थकीत असलेले वीजबिल त्वरीत भरून महावितरणला सहकार्य करण्याचे आवाहन चंद्रपूर परिमंडळाचे मुख्य अभियंता अरविंद भादिकर यांनी केले आहे.
-----------------------------------------------------------------------------------------
चंद्रपूर परिमंडळातील ग्राहकनिहाय एकूण थकबाकी
ग्राहकांची वर्गवारी एकुण थकबाकी
घरगुती 18 कोटी 42 लाख
वणिज्यिक 5 कोटी 68 लाख
औदयोगिक 61लाख 19 हजार
ग्रामिण व षहरी पाणीपुरवठा येाजणा 97 लाख
कृशिपंपधारक 94 कोटी 50 लाख
ग्रामिण व शहरी पथदिवे 225 कोटी 17 लाख
कृषिपंपांची थकबाकी विभाग निहाय
चंद्रपूर जिल्हा
विभाग कृषी पंपाधारकांची संख्या थकबाकी
बल्लारशा 15807 26 कोटी 65 लाख
चंद्रपूर 6344 4 कोटी 80 लाख
वरोरा 16740 23 कोटी 80 लाख
ब्रम्हपुरी 12429 16 कोटी 73 लाख
चंद्रपूर जिल्हा एकूण 51320 71 कोटी 98 लाख
----------------------------------------------------------------------------------------------------------------------------
गडचिरोली जिल्हा
आलापल्ली 7852 11 कोटी 34 लाख
गडचिरेाली 10846 11 कोटी 14 लाख
गडचिरोली जिल्हा एकूण 18698 22 कोटी 48 लाख
News - Chandrapur | Posted : 2018-10-31