क्रिकेट : भारत -पाकिस्तान आता दरवर्षी भिडणार


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
वृत्तसंस्था / नवी दिल्ली :
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील द्विपक्षीय क्रिकेट मालिका बंद आहेत. मात्र आयसीसीच्या स्पर्धांमध्ये हे कट्टर प्रतिस्पर्धी आमने-सामने उभे ठाकणार आहेत. 2021 ते 2031पर्यंत दर वर्षी कुठला तरी वर्ल्ड कप पिंवा चॅम्पियन्स ट्रॉफी असणार आहे. त्यामुळे या 11 वर्षांच्या काळात दर वर्षी भारत -पाकिस्तान यांच्यात सामने बघायला मिळतील. यावर्षी भारतातील वर्ल्ड कपनंतर पुढील वर्षी ऑस्ट्रेलियात टी-20 वर्ल्ड कप रंगणार आहे. 2018पासून चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा रद्द करून त्या जागी टी-20 वर्ल्ड कपला स्थान देण्यात आले होते. मात्र एफटीपीच्या वेळापत्रकानुसार आता 2025 आणि 2029मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफीचे आयोजन होणार आहे.

वर्ल्ड कपसाठी संघ वाढविले

ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात भारतात  टी-20 वर्ल्ड कप होणार आहे. मात्र देशातील कोरोनाचे संकट बघता हा वर्ल्ड कप संयुक्त अरब अमिराती (यूएई) येथे स्थलांतरीत करण्यासाठी विचार सुरू आहे. पुरुषांच्या वन डे आणि टी-20 वर्ल्ड कपमधील संघांची संख्याही वाढविण्यात आली आहे. वन डे वर्ल्ड कपमध्ये 14 आणि टी-20 वर्ल्ड कपमध्ये 20 संघ खेळणार आहेत. सध्या वन डे वर्ल्ड कपमध्ये 10 संघांचा समावेश आहे, तर 2027पासून 14 संघ असतील. हे संघ प्रत्येकी सात अशा दोन गटांत विभागले जातील. प्रत्येक गटातील तीन संघ सुपर सिक्समध्ये पोहोचतील. त्यानंतर सेमिफायनल आणि फायनल लढती होतील. म्हणजे तब्बल 24 वर्षांनंतर पुन्हा सुपर-6 फॉरमॅटमध्ये वर्ल्ड कप रंगणार आहे.
  Print


News - World | Posted : 2021-06-03


Related Photos