महत्वाच्या बातम्या

 आष्टि पोलिसांची कार्यवाही : दारुसह एकूण ४ लाख २ हजाराचा मुद्देमाल जप्त


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

तालुका प्रतिनिधी / आष्टी : २१ जानेवारी २०२३ रोजी  गोपनीय सूत्राद्वारे मौजा-चंद्रपूर ते आष्टी मार्गे येथून एक सील्हर रंगाची होंडा सिविक कंपनीची कार गाडी क्र. एम.एच.३३ सी.पी.२७५२ या गाडी मधून चोरट्या मार्गाने अवैध्य रीत्या दारूची वाहतूक होत असल्याची माहिती आम्हा पोलिस निरीक्षक गावडे ना मिळाल्याने आम्ही स्वतः हा तसेच पोस्टे स्टाॅफ असे खाजगी वाहनाने रवाना होऊन मौजा-आष्टी फॉरेस्ट नाका येथे नमूद गाडीस थांबवून सदर गाडी चेक केले असता त्यामध्ये 

१) ९० मि. लि.मापाचे देशी दारू संत्रा कंपनीचे दारूच्या अंदाजे किंमत एकूण-१२०,०००/-  रू. मुद्देमाल  

२) तसेच ५०० मी.ली. मापाचे हायवर्ड-५००० कंपनीचे अंदाजे किंमत एकूण-७२,०००/- रू मुद्देमाल

३) तसेच २ लिटर क्षमतेचे रॉयल स्ट्राँग व्हिस्की कंपनीचे विदेशी दारूच्या अंदाजे किंमत-३०,०००/- रू

४) तसेच एक सिल्वर रंगाची होंडा सीव्हीक कंपनीची कार जुनी वापरती किंमत अंदाजे-१५०,०००/- रु

५) तसेच नमूद चार चाकी वाहन यास पायलटीग करणारी एक कत्या रंगाची सुझुकी एक्सेस कंपनीची बिना नंबरची स्कुटी किंमत अंदाजे-३०,०००/-

असा एकुण दारूचा -२,२२०००/-रू  व चारचाकी व दुचाकी किं. अं. १८०,०००/-रू  असा एकूण-४,०२,०००/- मुद्देमाल मिळुन आला.

सदर गाडी मधील दोन इसम नामे - १) महेश धनराज कांबळे वय-४० मु.पो.ता.जील्हा. चंद्रपूर, २) संदीप जगदीश पुणेकर वय-३० वर्ष  मु. विसापूर ता. बल्लारशाह जिल्हा. चंद्रपूर व पाहिजे आरोपी असे एकूण ३ आरोपी यांचे विरुद्ध  पोस्टे अप क्र. २०/२०२३ कलम- ६५ (अ) ८३,म.दा.का अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून दोन आरोपी यांना अटक करण्यात आली आहे. सदरची कामगिरी पोलीस निरीक्षक कुंदन गावडे पोलीस उपनिरीक्षक अजयकुमार  राठोड, पोलीस उपनिरीक्षक गणेश जंगले, पोहवा/२०६७ मोरेश्वर करमे, नापोशि/५१७७ प्रवीण सुरवाडे, पोशि/४१५४ मुक्तेश्वर पोतराजे, पोशि/५२८७ कुंडलिक चौधरी ,पोशि/५६९० राजू पंचफुलीवार, पोशि/३४१२ अतुल तोडासे यांनी केली.





  Print






News - Chandrapur




Related Photos