महत्वाच्या बातम्या

 माऊली महिला नागरी सहकारी पतसंस्था मर्या नं.१००१/१३ संस्थेच्या वतीने हळदीकुंकु कार्यक्रम संपन्न


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

शहर प्रतिनिधी / देसाईगंज : माऊली महिला नागरी सहकारी पतसंस्था मर्या देसाईगंज नं.१००१/१३ या संस्थेच्या वतीने 22 जानेवारी 2023 ला संस्थेच्या कार्यालयात सर्व सभासदांचे स्नेहाचे व आपुलकीचे नाते कायम राहुन ते वृदींगत व्हावे या दृष्टीकोनातून हळदीकुंकु कार्यक्रम सावित्रीबाई फूले व लक्ष्मी मातेच्या प्रतीमेला मालार्पण व दिप प्रज्वलन करून सुरवात करण्यात आली. उपस्थीत पाहुण्याचे शाल श्रीफळ देवून स्वागत करण्यात आले तसेचे संस्थेत श्री अब्दुल वहीद शेख दैनिक अभिकर्ता याचे बॅग, शाल व श्रीफळ देवून सत्कार करण्यात आले .तसेच संस्थेचे अभिकत्यांना बॅग देवुन सत्कार केले. या कार्यक्रमाचे मुख्य मार्गदर्शीका मा. सुजाता भोपळे पोलीस उपनिरिक्षक पोलीस ठाणे देसाईगंज यांनी महीला सक्षमीकरण, सायबर गुन्हे, अल्पवहीन मुला मुलीकडील मोबाईल मुळे होणारी हानी व कायदेविषयक महीती याबाबतचे मोलाचे मार्गदर्शन केले. प्रियंका सयाम पोलीस ठाणे देसाईगंज स्वेता श्रीकांत राऊत विस्तार अधिकारी पंचायत समीती नागभीड महीला बचत गटाबाबत बचत का योग महान देश बने धनवान पैशाच्या मुल्या याबाबत मोलाचे मार्गदर्शन केले. सेवता सेगोजी अवसरे माजी उपसभापती पंचायत समीती देसाईगंज यानी महीला सक्षमीकरणाबाबत मोलाचे मार्गदर्शन केले. कार्यक्रमाची संचालन सौ.  सुलभा प्रभाकर प्रधान यांनी केले. प्रस्तावणा सौ. अर्चना हितेंद्र घोटे यांनी केले. संस्थेचे अध्यक्ष सौ. लता मुरलीधर सुंदरकर यानी संस्थेविषय इतमु महीती माडली. आभार सौ. किरण भरत मडावी यांनी केले. या कार्यक्रमाला उपस्थीत सर्व महीला सभासद मार्गदशीका, सर्व संस्थेचे पदाधिकारी, कर्मचारी, उपस्थीत होते.





  Print






News - Gadchiroli




Related Photos