नागपूर विभागीय मंडळाच्या सहसचिव माधूरी सावरकर यांची लोक बिरीदरी प्रकल्पास भेट


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / भामरागड : 
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या,  नागपूर विभागीय मंडळाच्या सहसचिव माधूरी सावरकर यांनी २७ आक्टोबर रोजी लोक बिरादरी प्रकल्पास सदिच्छा भेट दिली. याप्रसंगी त्यांनी  डॉ प्रकाश  आमटे व डॉ मंदाताई आमटे यांच्याकडून लोक बिरादरी प्रकल्पातील विविध उपक्रमांविषयी जाणून घेतले. 
डॉ प्रकाश  आमटे व डॉ मंदाताई आमटे यांच्या कार्यातून आपल्याला प्रेरणा मिळाली आहे. हे अलौकीक कार्य पाहून आपण भारावून गेलो आहोत अशी भावना त्यांनी या प्रसंगी व्यक्त केली. त्यानंतर  समिक्षाताई आमटे याच्या मार्गदर्शनात माधूरीताईंनी मुलांशी संवाद साधला. मुलांशी संवाद साधताना त्या म्हणाल्या की अत्यंत प्रेरणादायी अशा वातावरणात तुम्ही राहात आहात तुमच्या व्यक्तीमत्वाचीजडण-घडण आनंददायी अशा वातावरणात होत आहे ही खूप आनंदाची गोष्ट आहे.माझ्या कामाचे स्वरूप SSC / HSC परीक्षांचे नियोजन करणे व त्या सुरळीतपणे पार पाडणे असे  आहे. त्यामुळे दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यानी योग्य निय़ोजन करून अभ्यास करावा असे मार्गदर्शन त्यांनी केले. त्याचबरोबर विविध संकल्पना समजून घेऊन अभ्यास करावा असे मत त्यांनी व्यक्त केले. मातृभाषेतून शिक्षण घेतल्याने विविध संकल्पना स्पष्ट होतात व पुढील शिक्षणाचा पाया मजबूत होतो असे त्या म्हणाल्या. याप्रसंगी त्यांनी भामरागडच्या गटशिक्षणाधिकारी अश्विनीताई सोनावणे यांचे कौतूक केले. शैक्षणिक दर्जा व परीक्षाकेंद्राचे संचालन याविषयी त्या उत्तम कार्य करीत आहेत. याप्रसंगी  अश्विनीताई सोनावणे यानी अभ्यासाचे निय़ोजन, अभ्यासगट, दररोज ३० मि. वाचन व त्यावर चर्चा इ. बाबत मार्गदर्शन केले.याप्रसंगी प्रा. डॉ इंगोले, प्रा. जुमडे आदि मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले. प्राचार्य डॉ तळवेकर  आभार व्यक्त करताना म्हणाले की मान्यवरांनी व्यक्त केलेले विचार अत्यंत उपयुक्त आहेत व विद्यार्थ्यानी ते अंमलात आणून आपला व्यक्तीमत्व विकास साधावा.कार्यक्रमास सर्व विद्यार्थी व शिक्षक उपस्थित होते.

   Print


News - Gadchiroli | Posted : 2018-10-31


Related Photos