पेंढरी उपपोलिस ठाण्याच्या वतीने ज्येष्ठ नागरीक मेळावा, राशनकार्ड वितरण कार्यक्रम


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / पेंढरी :
पोलिस आणि जनता यांच्या समन्वय साधण्यासाठी काल ३० आॅक्टोबर रोजी पेंढरी पोलिस ठाण्याच्या वतीने भव्य ज्येष्ठ नागरीक मेळावा व राशन कार्ड वितरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाप्रसंगी उपविभागीय पोलिस अधिकारी शिवपुजे, तहसीलदार गणवीर, जि.प. सदस्य श्रीनिवास दुल्लमवार, संवर्ग विकास अधिकारी यशवंत भांड, पं.स. सदस्या रोशनी पवार, सिआरपीएफचे असिस्टंट कमांडंट श्रीअपर्ण सिंग, एसआरपीएफचे पोलिस निरीक्षक  चव्हाण, पेंढरीचे सरपंच पवन येरमे, सचिव मेश्राम, झाडापापडा ग्रा.पं. चे सचिव जनबंधु, पेंढरीचे तलाठी आडे, सावंगा बु. चे सरपंच बाबुराव गेडाम आदी मान्यवर उपस्थित होते. भगवान बिरसा मुंडा यांच्रूा प्रतीमेला हार अर्पण करून ज्येष्ठ नागरीक मेळावा व राशनकार्ड वितरण कार्यक्रमाला सुरूवात करण्यात आली. उपविभागीय पोलिस अधिकारी बसवराज शिवपुजे यांनी उपस्थित ज्येष्ठ नागरीकांना शासनाच्या सर्व योजनांची तसेच आर्थिक परिस्थितीमुळे आपले शिक्षण सोडलेल्या विद्यार्थ्यांसाठी पोलिस विभागाकडून सुरू करण्यात आलेल्या यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाविषयी माहिती देवून पोलिस विभागास सहकार्य करण्याचे आवाहन केले.
तहसीलदार गणवीर यांनी पोलिस विभागाच्या मदतीने शासनाच्या सर्व योजना जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी आम्ही प्रयत्न करू तसेच उपस्थित ७०० ते ७५० नागरिकांच्या खराब झालेल्या, पूर्णतः फाटलेल्या, नवीन राशनकार्डसाठी आवश्यक असणाऱ्या कागदपत्रांबाबत माहिती दिली. यापैकी २३० नागरिकांना लगेच राशनकार्डची दुयम प्रत वितरीत करण्यात आली. मतदार यादीमध्ये नाव नोंदणी करण्याचे आवाहन पोलिस विभागाकडून करण्यात आले. नागरिकांना जात प्रमाणपत्र देण्याचे आश्वासन सबंधित विभागाने दिले. 

   Print


News - Gadchiroli | Posted : 2018-10-31


Related Photos