महत्वाच्या बातम्या

 आजचे दिनविशेष  


महत्वाच्या घटना (२२ जानेवारी)

२२ जानेवारी १९०१ : राणी व्हिक्टोरियाच्या निधनानंतर ७ वा एडवर्ड हा इंग्लंडचा राजा झाला.

२२ जानेवारी १९२४ : रॅम्से मॅकडोनाल्ड इंग्लंडचे पंतप्रधान बनले. ब्रिटनमधे मजूरपक्ष प्रथमच सत्तेवर आला.

२२ जानेवारी १९४७ : भारतीय घटनेची रूपरेषा कशी असावी याविषयीचा ठराव घटना समितीत मंजूर झाली.

२२ जानेवारी १९६३ : डेहराडून येथे अंधांसाठी राष्ट्रीय ग्रंथालय स्थापन केले.

२२ जानेवारी १९७१ : सर्व मित्र सिकरी यांनी भारताचे १३ वे सरन्यायाधीश म्हणून कार्यभार सांभाळला.

२२ जानेवारी १९९९ : ऑस्ट्रेलियन धर्मप्रसारक ग्रॅहॅम स्टेन्स व त्याच्या दोन मुलांची ओरिसाच्या केओंझार जिल्ह्यातील मनोहरपूर येथे मोटारीत जाळून हत्या करण्यात आली.

२२ जानेवारी २००१ : आय. एन. एस. मुंबई ही क्षेपणास्त्रवाहू नौका भारतीय नौदलात दाखल झाली.

२२ जानेवारी २०१५ : बेटी बचाओ, बेटी पढाओ या योजनेची स्थापना विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पानिपत हरियाणा येथे झाली.

जन्म (२२ जानेवारी)

२२ जानेवारी १५६१ : इंग्लिश तत्त्ववेत्ते व मुत्सद्दी सर फ्रँन्सिस बेकन यांचा जन्म. (मृत्यू: ९ एप्रिल १६२६)

२२ जानेवारी १८९६ : कवी सुर्यकांत त्रिपाठी उर्फ निशाला यांचा जन्म.

२२ जानेवारी १८९९ : हिंदुस्तानी संगीतज्ज्ञ दिलीप कुमार रॉय यांचा जन्म.

२२ जानेवारी १९०१ : भारतीय मानवशास्रज्ञ निर्मलकुमार बोस यांचा जन्म.

२२ जानेवारी १९०९ : संयुक्त राष्ट्रांचे तिसरे सरचिटणीस यू. थांट यांचा जन्म. (मृत्यू: २५ नोव्हेंबर १९७४)

२२ जानेवारी १९११ : मराठी लेखक अनिरुद्ध घनश्याम रेळे यांचा जन्म.

२२ जानेवारी १९१६ : गुजराथी लेखक आणि कवी हरीलाल उपाध्याय यांचा जन्म. (मृत्यू: १५ जानेवारी १९९४)

२२ जानेवारी १९१६ : बंगाली आणि हिंदी चित्रपट दिगदर्शक आणि पटकथा लेखक सत्येन बोस यांचा जन्म. (मृत्यू: ९ जून १९९३)

२२ जानेवारी १९२० : संतसाहित्याचे अभ्यासक प्रा. ह. श्री. शेणोलीकर यांचा जन्म.

२२ जानेवारी १९२२ : मराठी लेखिका शांता बुध्दिसागर यांचा जन्म.

२२ जानेवारी १९३४ : हिंदी चित्रपट निर्माते आणि दिगदर्शक विजय आनंद यांचा जन्म. (मृत्यू: २३ फेब्रुवारी २००४)

२२ जानेवारी १९२० : संतसाहित्याचे अभ्यासक प्रा. ह. श्री. शेणोलीकर यांचा जन्म.

मृत्यू (२२ जानेवारी)

२२ जानेवारी १२९७ : योगी चांगदेव यांनी समाधी घेतली.

२२ जानेवारी १६६६ : ५ वे मुघल सम्राट शहाजहान यांचे आपल्याच मुलाच्या (औरंगजेब) कैदेत १० वर्षे राहिल्यानंतर निधन. (जन्म: ५ जानेवारी १५९२)

२२ जानेवारी १६८२ : समर्थ रामदास स्वामी यांचे निधन.

२२ जानेवारी १७९९ : ऑस्ट्रीयन उमराव, डॉक्टर आणि आधुनिक गिर्यारोहणशास्त्राचे जनक होरॅस बेनेडिट्ट डी सास्युरे यांचे निधन.

२२ जानेवारी १९०१ : ६३ वर्षे आणि २१६ दिवस इंग्लंडवर राज्य करणारी इंग्लंडची राणी व्हिक्टोरिया यांचे निधन. (जन्म: २४ मे १८१९)

२२ जानेवारी १९२२ : शांततेचे नोबेल पारितोषिक विजेते बायर फिद्रिक यांचे निधन.

२२ जानेवारी १९६७ : क्रांतिकारक, दिद्वान, कृषितज्ज्ञ, इतिहासकार आणि गदर पार्टीचे शिल्पकार डॉ. पांडुरंग सदाशिव खानखोजे यांचे निधन. (जन्म: ७ नोव्हेंबर १८८४)

२२ जानेवारी १९७२ : राजनीतिज्ञ आणि शिक्षणतज्ज्ञ स्वामी रामानंद तीर्थ यांचे निधन. (जन्म: ३ ऑक्टोबर १९०३)

२२ जानेवारी १९७३ : अमेरिकेचे ३६ वे राष्ट्राध्यक्ष लिंडन बी. जॉन्सन यांचे निधन. (जन्म: २७ ऑगस्ट १९०८)

२२ जानेवारी १९७५ : केशवसुत संप्रदायी आधुनिक कवी काव्यविहारी धोंडो वासुदेव गद्रे यांचे निधन. (जन्म: १६ नोव्हेंबर १८९४)

२२ जानेवारी १९७८ : इंग्लिश क्रिकेटपटू हर्बर्ट सटक्लिफ यांचे निधन. (जन्म: २४ नोव्हेंबर १८९४)

२२ जानेवारी १९९९ : ऑस्ट्रेलियन धर्मप्रसारक ग्रॅहॅम स्टेन्स आणि त्याच्या दोन मुलांची ओदिशाच्या केओंझोर जिल्यातील मनोहरपूर येथे मोटारीत जाळून हत्या करण्यात आली.





  Print






News - todayspecialdays




Related Photos