महत्वाच्या बातम्या

 आ. डॉ. देवराव होळी यांच्या हस्ते भिवापूर येथे कबड्डी स्पर्धेचे उद्घाटन


- आजपासून रंगणार भिवापूर येथे ग्रामीण भागातील मुलांच्या कबड्डीची भव्य स्पर्धा 

- आर के ७ स्टार कबड्डी क्लब भिवापूर च्या वतीने भव्य कबड्डी सामन्यांचे आयोजन 

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / गडचिरोली : आर के ७ स्टार कबड्डी क्लब भिवापूरच्या वतीने आज पासून भिवापूर येथे भव्य कबड्डी सामन्यांचे आयोजन करण्यात आले असून या कबड्डी सामन्यांची स्पर्धेचे उद्घाटन आमदार डॉक्टर देवराव होळी यांचे हस्ते करण्यात आले.

यावेळी भाजपा युवा मोर्चाचे जिल्हा महामंत्री मधुकरराव भांडेकर, तालुक्याचे अध्यक्ष दिलीप चलाख, बंगाली आघाडीचे महामंत्री सुशांत राय, लक्ष्मण वासेकर जिल्हा परिषदेचे सदस्य, लक्ष्मण वासेकर माजी ग्रामपंचायत सदस्य, भिवापूरचे माजी उपसरपंच लालाजी भोयर, ग्रामपंचायत सदस्य देविदास गवारे, वैशालीताई कुनघाडकर, पोलीस पाटील भगीरथ भांडेकर यांच्यासह क्रीडा प्रेमी प्रामुख्याने मोठ्या संख्येने उपस्थित होते. 





  Print






News - Gadchiroli




Related Photos