महत्वाच्या बातम्या

 भामरागड़ येथे SCERT च्या टीमसह DIET गडचिरोली टिमच्या शाळांना भेटी


- अवघड क्षेत्रात चालु असणाऱ्या शैक्षणिक उपक्रमाबद्दल समाधान व्यक्त केले

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / भामरागड़ :  20 जानेवारी 2023 ला डॉ. नेहा बेलसरे , उपसंचालक SCERT पुणे , डॉ. सचिन चव्हाण, विभाग प्रमुख SC ERT पुणे डॉ. विनीत मत्ते , प्राचार्य DIET गडचिरोली येग्लोपवार अधिव्याख्याता DIET गडचिरोली, डॉ. विजय रामटेके DIET गडचिरोली, तपन सरकार  DIET गडचिरोली यांनी भामरागड तालुक्यातील, जिल्हा परिषद  प्राथमीक शाळा कोयनगुडा, लोक बिरादरी विद्यालय हेमलकसा , जिल्हा परिषद समूह निवासी शाळा तथा मॉडेल स्कूल भामरागड. KGBV भामरागडच्या इयत्ता 10 वी च्या मुलींना विशेष मार्गदर्शन करण्यात आले आणि या शाळा भेटी दरम्यान फुलोरा मूलभूत क्षमता व, विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांची उपस्थिती, शाळाबाह्य विद्यार्थी व त्यावरील उपाय शाळेत कोणकोणते उपक्रम राबविले जातात. शाळेला शासनाच्या कोणकोणत्या योजना प्राप्त झाल्या पालकांच्या सभा व पालकांची उपस्थितीचे प्रमाण शालेय आरोग्य कार्यक्रम शाळेत राबविले जाणारे , नाविन्यपूर्ण उपक्रम यावर सविस्तर चर्चा करून माहिती जाणून घेतली आणि मार्गदर्शन केले. तसेच प्रकाश आमटे व सौ. मंदाकिनी आमटे यांच्या सोबत अवघड क्षेत्रात चालू शैक्षणिक घडामोडी व शिक्षण क्षेत्रात होणारे नाविन्य पूर्ण बदल याबाबत सविस्तर चर्चा केली व गटशिक्षणाधिकारी वडलकोंडा यांच्या मार्गदर्शनात अवघड क्षेत्रात चालू असणाऱ्या शैक्षणिक उपक्रमाबद्दल समाधान व्यक्त केले यावेळी अननदेलवार केंद्रप्रमुख केंद्र लाहेरि. विनीत पदमावार मु अ जिल्हा परिषद कोयनगुड़ा, अवथरे मु अ मॉडेल स्कूल भामरागड़ आदी उपस्थित होते.





  Print






News - Gadchiroli




Related Photos