महत्वाच्या बातम्या

 आ. विनोद अग्रवाल यांच्या प्रयत्नातून मुरी ते चुटिया मार्गासाठी १० कोटींचा निधी मंजूर


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / गोंदिया : मुरी ते चुटिया या मार्गासाठी आमदार विनोद अग्रवाल यांनी 10 कोटींचा निधी मंजूर केला आहे. या मार्गावर एफसीसीआयचे गोदाम असल्याने या मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक सुरू असते. त्यासाठी मुर्री ते चुटिया या रस्त्याचे सिमेंटीकरण करण्यात येणार असून चांगला रस्ता तयार झाल्याने प्रवाशांना कोणत्याही अडचणीचा सामना करावा लागणार नाही, तसेच हा मुख्य रस्ता असल्याने शहरापासून जवळच असल्याने वाहतूक सतत चालू राहते. यासाठी या रस्त्याचे काम उच्च दर्जाचे व्हावे, यासाठी गोंदिया विधानसभा मतदारसंघाचे आमदार विनोद अग्रवाल यांनी 10 कोटींचा निधी मंजूर केला आहे.

गेल्या तीन वर्षांपासून गोंदिया विधानसभा मतदारसंघातील अनेक रस्त्यांचे मजबुतीकरण, तसेच गावांना शहरांशी जोडण्यासाठी मोठे रस्ते बांधण्याचे काम आमदार विनोद अग्रवाल यांच्या हस्ते सुरू आहे. जेणेकरून गावातील तरुणांना शहरात रोजगार उपलब्ध होऊ शकेल, म्हणूनच या उपक्रमातून गोंदिया विधानसभेचे इतर मार्ग शहराशी जोडले जात आहेत.

गोंदिया विधानसभा मतदारसंघात अनेक रस्त्यांच्या कामाला सुरुवात झाली असून कोट्यवधींचा निधी आमदार विनोद अग्रवाल यांनी मंजूर केला आहे. यासोबतच गोंदियातील इतर रस्त्यांच्या कामालाही काही दिवसांत सुरुवात होणार आहे.





  Print






News - Gondia




Related Photos