दक्षिण कोरिया मधील तिसऱ्या जागतिक शिकई मार्शल आर्ट स्पर्धेत गडचिरोलीच्या खेळाडूंची उतुंग भरारी


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली : 
दक्षिण कोरियात २४ ते २९ ऑक्टोबर दरम्यान पार पडलेल्या तिसऱ्या  जागतिक शिकई मार्शल आर्ट स्पर्धेत गडचिरोलीच्या खेडाडूंनी भारताचे प्रतिनिधित्व करीत उत्तुंग भरारी घेतली आहे. या खेळाडूंचे गडचिरोलीत जंगी स्वागत करण्यात आले. 
 तिसऱ्या  जागतिक शिकई मार्शल आर्ट स्पर्धेत  १९ देश सहभागी होते. त्यात भारतीय चमूत ३० खेळाडूंचा समावेश होता. त्यातही गडचिरोली जिल्ह्याचे एकूण ०६ खेडाडू सहभागी झाले होते.  यात  एंजेल देवकुले हिने २ सुवर्णपदक पटकाविले.  शेजल गद्देवर, रजत सेलोकर, संदीप पेदापल्ली , अवंती गांगरेड्डीवार , यशराज सोमनानी यांनी प्रत्येकी १ सुवर्णपदक पटकावून   विजयी पताका आणली आहे. 
फटाक्यांची आतिषबाजी व वाद्याच्या गजरात खेडाडूंचे  या सर्व खेळाडूंचे गडचिरोलीत  स्वागत करण्यात आले. यावेळी सी.एम.चषक जिल्हासंयोजक तथा भाजयु मोर्चाचे शहराध्यक्ष अनिल तिडके,   स्कूल ऑफ स्कालर चे प्राचार्य  निखील तुकदेवे  यांनी खेळाडूंचे मनोधैर्य उंचावण्याचे काम करीत भव्य स्वागत  केले. सोबत सी.एम चषक जिल्हा पदाधिकारी निखील चरडे, तुषार चोपकार,  अरबाज खान, रोहित खेडेकर, महेश निलेकर यांनी  भव्य स्वागत केले. 
यात सर्व स्थानिक स्कूल ऑफ स्कालर च्या विद्यार्थ्यांचा सहभाग होता.  खेळाडूंनी या  यशाचे श्रेय स्कूल ऑफ स्कालर गडचिरोलीचे  प्राचार्य निखील तुकदेवे, शिक्षकवृंद , प्रशिक्षक संदीप पेदापल्ली  तथा पालकांना दिले आहे.  Print


News - Gadchiroli | Posted : 2018-10-30


Related Photos