पंजाबमध्ये भारतीय वायूसेनेचे मिग-21 बिसॉन विमानाला अपघात : पायलटचा मृत्यू


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
वृत्तसंस्था / चंदीगड :
मोगाजवळील बाघापुराना याठिकाणी असणाऱ्या लंगियाना खुर्द या गावात भारतीय वायूसेनेच  एक फायटर जेट मिग-21 बिसॉन  दुर्घटनाग्रस्त झाल्याची माहिती मिळते आहे. मिळालेल्या माहितीनुसार ट्रेनिंग दरम्यान पायलट अभिनव चौधरी यांनी मिग-21   मधून राजस्थानातील सूरतगडमधून हलवारा आणि हलवारामधून सूरतगडसाठी उड्डाण केले होते. यावेळी बाघापुरानाच्या जवळपास त्यांचे फायटर जेट क्रॅश झाले आहे. या अपघातामध्ये पायलट अभिनव चौधरी यांचा मृत्यू झाला आहे.
अपघाताची माहिती मिळताच भारतीय वायूसेनेने घटनास्थळी त्यांची एक टीम पाठवली आहे. मिळालेल्या माहितीनुसार शोधमोहीम केल्यानंतर पायलट अभिनव यांचा मृतदेह सापडला आहे. वायू सेनेच्या अधिकाऱ्यांनी दुर्घटनेचं कारण शोधण्याचे आदेश दिले आहेत. अद्याप ही घटना कशी घडली याबाबत ठोस कारण समोर आलेलं नाही आहे.  या घटनेचा एक व्हिडीओ देखील सोशल मीडियाच्या माध्यमातून समोर आलेला आहे.
दरम्याना ही घटना कशामुळे घडली याचा तपास केला जात आहे. वायू सेनेच्या अधिकाऱ्यांनी दुर्घटनेचं कारण शोधण्याचे आदेश दिले आहेत.
  Print


News - World | Posted : 2021-05-21


Related Photos