कानशिलावर बंदूक ताणून युवकास लूटले


- सेवाग्राम रेल्वेस्थानकाकडे जाणाऱ्या मार्गावरील घटना
- शहर पोलिसात गुन्हा दाखल
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
जिल्हा प्रतिनिधी/ वर्धा :
सेवाग्राम रेल्वे स्थानकावरून वर्धा कडे येत असताना मागून दुचाकीने आलेल्या युवकांनी एका युवकाला रस्त्यात अडवून त्याच्या
कानशीलावर बंदूक ताणून बंदुकीच्या धाकावर लूटमार केल्याची घटना उघडकीस आली. या घटनेने एकच खळबळ माजली असून याप्रकरणी शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सुधीर अजाब कोवार रा. गजानननगर हे दोन दिवसांपूर्वी रात्रीच्या सुमारास जून्या सेवाग्राम स्टेशन्या रस्त्याने आपल्या काही मित्रांसह वर्धाकडे दुचाकीने येत होते. भरधाव मागून आलेल्या काहींनी सुधीर आणि त्यांच्या मित्रांना रस्त्यात अडवले आणि एकाने जवळील बंदूक कानशीलावर ताणून दोन मोबाईल, ४०० रुपये नगदी आणि अंगठी असा मुद्देमाल हिसकावून नेला. या घटनेची सुधीर कोवार यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पोलिसांनी अज्ञातांविरुध्द गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास शहर पोलिस करीत आहे.

   Print


News - Wardha | Posted : 2018-10-30


Related Photos