कोरचीत चक्रीवादळ : गारांसह जोरदार पावसाने लावली हजेरी, बीएसएनएलचा टावर कोसळला


- अनेकांचे नुकसान, विद्युत पुरवठा खंडित

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / कोरची :
तौक्ते चक्रीवादळाचा प्रभाव ओसरल्यानंतर कोरची तालुक्यात सायंकाळी चार ते पाच च्या दरम्यान पंधरा ते वीस मिनिटे आलेल्या गारांचा पाऊस व चक्रीवादळाने अनेक ठिकाणी झाडे पडली तर तहसील कार्यालयात असलेले बीएसएनएल चे टावर कोसळून अनेकांचे नुकसान झाले असून विद्युत पुरवठा खंडित झालेला आहे.
गेल्या दोन दिवसापासून मुंबई, रत्नागिरी, ठाणे या परिसरात तौत्के चक्रीवादळाचा तडका सुरू असताना तौत्के चक्रीवादळ गुजरातच्या दिशेने वळले असताना आज दुपारी चार ते पाच वाजताच्या दरम्यान कोरची तालुक्यात चक्रीवादळ सह गारांचा पाऊस झाला. यात कोरची येथील तहसिल कार्यालयात असलेल्या बीएसएनएल चे टावर कोसळले, घरावरील पत्रे, घरावरील पाण्याच्या टाक्या उडाल्या, शेतातील रब्बी धान्य नुकसान झाले, आंबा चे अतोनात नुकसान झाले असून जीथे तीथे झाडे पडल्याने विद्युत पुरवठा खंडित झालेला आहे.  त्यामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून आर्थिक मदत देण्यात यावी अशी मागणी सर्व स्तरावर केली जात आहे.  पण मागील वर्षी झालेल्या चक्रीवादळ नुकसानीचे अजून पर्यंत नुकसान भरपाई मीळाली नाही त्यामुळे नुकसान भरपाई न मिळण्यास  स्थानिक पातळीवर असलेल्या प्रशासन जबाबदार आहे की शासन असा प्रश्न नुकसान ग्रस्त नागरिकांनी केला आहे. 
  Print


News - Gadchiroli | Posted : 2021-05-19


Related Photos