www.mahajyoti.org.in या संकेत स्थळावरील नोटीस बोर्ड मधील पोलीस भरती पूर्व प्रशिक्षण या टॅबवर जाऊन ऑनलाईन पध्दतीने अर्ज करावा. तरी महाराष्ट्रातील इतर मागास वर्ग विमुक्त जाती - भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना पोलीस मिलिटरी भरती पूर्व प्रशिक्षणा करिता अर्ज करण्याचे आवाहन महाज्योती मार्फत करण्यात येत आहे.

" /> www.mahajyoti.org.in या संकेत स्थळावरील नोटीस बोर्ड मधील पोलीस भरती पूर्व प्रशिक्षण या टॅबवर जाऊन ऑनलाईन पध्दतीने अर्ज करावा. तरी महाराष्ट्रातील इतर मागास वर्ग विमुक्त जाती - भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना पोलीस मिलिटरी भरती पूर्व प्रशिक्षणा करिता अर्ज करण्याचे आवाहन महाज्योती मार्फत करण्यात येत आहे.

"/>
महत्वाच्या बातम्या

 महाज्योती मार्फत पोलीस- मिलिटरी भरती पूर्व प्रशिक्षणाचा लाभ घेण्याचे आवाहन


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / भंडारा : महात्मा ज्योतीबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था (महाज्योती), नागपूर या संस्थेमार्फत इतर मागास वर्ग विमुक्त जाती - भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी पोलीस - मिलिटरी भरती पूर्व प्रशिक्षण राबविण्यात येते. या प्रशिक्षणासाठी विद्यार्थ्यांची नोंदणी प्रक्रिया सुरु करण्यात आली असून अर्ज करण्याची अंतिम 25 जानेवारी 2023 आहे. पोलीस-मिलिटरी भरती पूर्व प्रशिक्षणाचा लाभ घेण्याचे आवाहन महाज्योतीतर्फे करण्यात आले आहे. महाज्योती मार्फत प्रशिक्षण नागपूर व औरंगाबाद या दोन ठिकाणी देण्यात येणार आहे. प्रशिक्षणाचा कालावधी चार महिन्याचा असून प्रशिक्षण हे अनिवासी स्वरुपाचे आहे. सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांना दरमाह 6 हजार इतके विद्यावेतन देण्यात येणार आहे. तसेच प्रशिक्षण दरम्यान पुस्तके, गणवेश व बुट देखील देण्यात येणार आहे. प्रशिक्षणाचा लाभ घेण्यासाठी उमेदवार हा इतर मागास वर्ग विमुक्त जाती - भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गापैकी असावा तसेच तो नॉन क्रिमिलेअर गटातील असावा. उमेदवार किमान 12 वी उत्तीर्ण असावा. इच्छुक उमेदवाराने महाज्योतीच्या www.mahajyoti.org.in या संकेत स्थळावरील नोटीस बोर्ड मधील पोलीस भरती पूर्व प्रशिक्षण या टॅबवर जाऊन ऑनलाईन पध्दतीने अर्ज करावा. तरी महाराष्ट्रातील इतर मागास वर्ग विमुक्त जाती - भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना पोलीस मिलिटरी भरती पूर्व प्रशिक्षणा करिता अर्ज करण्याचे आवाहन महाज्योती मार्फत करण्यात येत आहे.





  Print






News - Bhandara




Related Photos