बँकेच्या कामकाजाच्या वेळेत बदल


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली :
गडचिरोली जिल्ह्यात कोविड-19 ची वाढती बाधीत रुग्ण संख्या लक्षात घेता व्यवस्थापक, जिल्हा अग्रणी बँक,गडचिरोली यांनी सादर केलेल्या प्रस्तवावानुसार दि. 15.05.2021 ते 31.05.2021 या कालावधी पर्यंत गडचिरोली जिल्ह्यातील सर्व बँकाचे ग्राहक सेवा व व्यवहाराबाबतचे कामकाज हे सकाळी 10.00 ते दुपारी 2.00 वाजेपर्यंत सुरु राहतील. तसेच 50 टक्के कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत काम करण्याची परवानगी देण्यात येत आहे. सदर आदेशाचे पालन न केल्यास संबंधीतावर भारतीय दंड संहिताचे कलम  188 व आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 चे कलम 51, 55 व 56 नुसार कार्यवाहीस पात्र राहील असे जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, गडचिरोली यांनी कळविले आहे.
  Print


News - Gadchiroli | Posted : 2021-05-17


Related Photos