महत्वाच्या बातम्या

 पैसे मागणाऱ्या तृतीयपंथीयांवर होणार गुन्हे दाखल


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / नागपूर : शहरातील विविध चौकात किंवा लग्न, उत्सव, स्नेह मिलन, जन्म-मृत्यू किंवा धार्मिक कार्यक्रम असल्यास तृतीयपंथी घरात घुसून बळजबरी पैशाची मागणी करतात. अशा तक्रारी वाढत असल्यामुळे पोलीस आयुक्तांनी विशेष अधिसूचना काढली असून आता तृतीयपंथीयांनी त्रस्त केल्याची तक्रार आल्यास गुन्हे दाखल करण्याचा आक्रमक पवित्रा पोलिसांनी घेतला आहे.

शहरातील काही प्रमुख चौकात तृतीयपंथीयांनी वाहनचालकांकडून बिदागीच्या नावावर बळजबरी पैसे वसूल करणे सुरू केले आहे. तसेच लग्न, उत्सव, स्नेह मिलन, जन्म-मृत्यू किंवा धार्मिक कार्यक्रम असल्यास तृतीयपंथी घरात घुसून बळजबरी पैशाची मागणी करण्याचेही प्रमाण वाढले होते. अनेकदा तृतीयपंथीयांच्या त्रासाला कंटाळून वाद-विवादसुद्धा रस्त्यावर होत होते. परंतु, तृतीयपंथी पैसे न दिल्यास थेट मारहाण किंवा अपमान करीत असल्यामुळे अनेकांनी पोलिसांकडे तोंडी तक्रार केल्या होत्या.

शहरात तृतीयपंथीयांचा वाढता त्रास लक्षात घेता पोलीस आयुक्तांनी अशा धोक्याच्या घटनांवर प्रतिबंध घालणे आवश्यक असल्याचे मान्य करीत तृतीयपंथीयांवर आता थेट गुन्हे दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे. जर कुणी तृतीयपंथी पैसे मागून त्रस्त करीत असल्यास थेट ११२ वर फोन करून तक्रार करण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.





  Print






News - Nagpur




Related Photos