अवघ्या पाच दिवसांच्या बाळाला घेऊन वडील बसले रुग्णालयाच्या दारात : पत्नी कोरोनामुक्त होण्याची वाट


विदर्भ न्यूज एक्स्प्रेस 
प्रतिनिधी / नवी दिल्ली :
देशभरात कोरोनाने डोके वरती उचलेलेअसून ऑक्सिजन, व्हेंटिलेटर बेडसाठी सुरू असलेली रुग्णांची आणि नातेवाईकांची धावाधाव संपता संपत नाही. दुसरीकडे उपचारांअभावी अनेक कुटुंबे उद्ध्वस्त होत आहेत तर काहींना कुटुंब सावरता सावरता कोलमडून पडायची वेळ आली आहे. 
तेलंगणा येथे बाळंतपणानंतर आई कोरोनाबाधित आढळल्याने अवघ्या पाच दिवसांच्या बाळाला घेऊन वडील रुग्णालयाच्या दारात बसले आहेत. हे ह्रदयद्रावक चित्र अनेकांचे काळीज हेलावून टाकत आहे. देशात कोरोनाने थैमान घातले आहे. कोरोनाग्रस्तांची संख्या २,४०,४६,८०९ वर पोहोचली आहे. देशात अनेक ठिकाणी आई वडिलांना कोरोनाने गाठल्याने लहान मुलांचा मोठा प्रश्न निर्माण झाला असताना नवजात बालकाचा हो फोटो अनेकांना विचलित करत आहे.
बाळंतपणानंतर आईला कोरोनाची लागण झाल्यामुळे अवघ्या पाच दिवसांच्या बाळाचे संगोपन करण्याची जबाबदारी वडिलांवर आली आहे. तेलंगणातील सिकंदराबादमध्ये पत्नी बरी व्हावी यासाठी पाच दिवसांच्या मुलीला घेऊन पती रुग्णालयाबाहेर वाट पाहत असल्याचे पहायला मिळत आहे. २० वर्षीय कृष्णा आपल्या लहानगीला एका खुर्चीत ठेवून पत्नीच्या बरे होण्याची वाट पाहत आहे. 
नवजात बालकालाही कोरोनाची लागण होऊ नये यासाठी खबरदारी म्हणून तिला आईपासून लांब ठेवण्यात आले आहे. मुलीची देखभाल करण्यासाठी कृष्णा यांची आई सोबत असून मुलीला दुधाची पावडर पाण्यात टाकून पाजली जात आहे. कृष्णाचे गाव तेलंगाणातील झहिराबाद असून ते हैदराबाद येथून ११५ किलोमीटरवर आहे.  त्यामुळे त्यांनी घरी परतण्याऐवजी रुग्णालयाबाहेर राहण्याचा निर्णय घेतला आहे. 
पत्नीने कोरोनावर मात केल्यानंतर आम्ही सर्वजण घरी जाऊ असा विश्वास कृष्णाला आहे. मात्र, आपली मुलगी कोणी चोरून नेईल, अशी भीतीही त्यांना सतावत आहे. त्यासाठी ते डोळ्यात तेल घालून काळजी घेत आहेत.
  Print


News - World | Posted : 2021-05-15


Related Photos