राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्याची ९ महिन्याची थकबाकी ऑक्टोबर च्या वेतनात रोखीने


- ना  सुधीर मुनगंटीवार यांची माहिती 
विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / मुंबई :
राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचाऱ्यांच्या महागाई  भत्त्याची  ९ महिन्याची थकबाकी ऑक्टोबर च्या वेतनात रोखीने देण्यात येणार असल्याची माहिती ना  सुधीर मुनगंटीवार यांनी दिली आहे. 
राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता १ जानेवारी २०१८ पासून १३९ वरून १४२ इतका करण्यात आला होता तसेच ऑक्टोबर २०१८ च्या वेतनात या महागाई भत्त्याची रक्कम रोखीने देण्याचे आदेश यापूर्वीच निर्गमित करण्यात आले होते. ९ महिन्याच्या थकबाकी चा निर्णय प्रलंबित होता.
 आता १ जानेवारी ते ३० सप्टेंबर २०१८ या ९  महिन्याच्या कालावधीची ३ टक्के महागाई भत्त्याची थकबाकी ची रक्कम ही ऑक्टोबर २०१८ च्या वेतनात रोखीने देण्याचे आदेश निर्गमित करण्यात आले आहेत,  अशी माहिती अर्थ मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली. या बाबतचा शासन निर्णय आज २९  ऑक्टोबर  रोजी वित्त विभागाने निर्गमित केल्याचेही ना.  मुनगंटीवार यांनी सांगितले.  Print


News - Rajy | Posted : 2018-10-29


Related Photos