पेरमिली येथील आश्रमशाळेच्या विद्यार्थिनीचा विनयभंग, पाच आरोपींना अटक


- आरोपींनी मोबाईलमध्ये चित्रीकरणही केले
- पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / पेरमिली (अहेरी) :
मित्रासोबत जंगल परिसरात झाडाच्या सावलीत बसून बोलत असलेल्या विद्यार्थिनीचा पाच जणांनी विनयभंग केला. तसेच घटनेचे मोबाईलमध्ये चित्रीकरणसुध्दा केले. सदर घटना आज २९ आॅक्टोबर रोजी उघडकीस आली असून आरोपींना अटक करण्यात आली आहे. विशेष म्हणजे पिडीत विद्यार्थिनी आणि आरोपीपैकी काही जण पेरमिली येथीलच शासकीय आश्रमशाळेमध्ये शिक्षण घेत आहेत.
बंटी अजय भेंडे (१७) , यशवंत मनोहर दुर्गे (१९) , प्रथमेश रमेश दहागावकर (१०) , अमरदीप विस्तारी झाडे (१७) आणि मानतू शंकर ईष्टाम (३०) सर्व रा. पेरमिली अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. आरोपींवर कलम ३५४ (अ) (ब), ३२३, ५०४ , ५०६ , ३४ भादंवी सहकलम बालकांचे लैंगिक अधिकारांपासून संरक्षण अधिनियम २०१२ कलम ८, १२ सहकलम माहिती तंत्रज्ञान अधिनियम २००० कलम ६६ (ई) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पिडीत मुलगी ही मुळ भामरागड तालुक्यातील रहिवासी आहे. ती पेरमिली येथील शासकीय आश्रमशाळेत शिक्षण घेत आहे. पिडीत मुलगी आपल्या मित्रासोबत जंगल परिसरात गप्पा मारत असताना आरोनींनी संगणमत करून तिचा विनयभंग केला. तसेच याचे मोबाईलमध्ये चित्रीकरणसुध्दा करण्यात आले. याबाबत पिडीत मुलीच्या तक्रारीवरून पेरमिली उपपोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपींना अटक करण्यात आली आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक प्रदिप गायकवाड करीत आहेत.

आश्रमशाळेच्या मुख्याध्यापक, अधीक्षकावर कारवाईची नागरिकांची मागणी

शासकीय आश्रमशाळेत शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांवर शाळेचे कोणतेही नियंत्रण नाही. यामुळे याआधीसुध्दा अशा घटना घडल्या आहेत. विद्यार्थी आश्रमशाळेतून केव्हाही बाहेर जातात. यामुळे आश्रमशाळेचे मुख्याध्यापक व महिला अधीक्षीकेवर कारवाई करण्यात यावी, अन्यथा आश्रमशाळेला कुलूप ठोकण्यात येईल, असा इशारा गावकऱ्यांनी दिला आहे.  Print


News - Gadchiroli | Posted : 2018-10-29


Related Photos