सी.एम. चषक क्रीडा व कला महोत्सवात मोठ्या संख्येने सहभागी व्हा : आ. डॉ. देवराव होळी


- विधानसभा आयोजन समितीच्या बैठकीत विविध स्पर्धांबाबत चर्चा 
विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली :
भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा महाराष्ट्र राज्य यांच्या संकल्पनेतून देशातील सर्वात मोठा क्रीडा व कला महोत्सव असणाऱ्या सी.एम. चषकाचे आयोजन ३० ऑक्टोबर २०१८ ते १२ जानेवारी २०१९ या कालावधीत होणार असून या स्पर्धेत राज्यातील ५० लाखाहून अधिक तरुण स्पर्धक सहभागी होणार आहेत. विजेत्या स्पर्धकांना सांघिक व वैयक्तिक रोख आकर्षक बक्षिसांसह मुख्यमंत्र्यांची स्वाक्षरी असलेल्या प्रमाणपत्राचे वितरण होणार आहेत. तरी या स्पर्धामध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हा असे आवाहन   गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉ. देवराव होळी यांनी केले आहे. 
  बैठकीला जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा योगिता भांडेकर, जिल्हा महामंत्री रवींद्र ओलारवार, प्रशांत वाघरे, ओबीसी आघाडी जिल्हा महामंत्री  मधुकर भांडेकर, अभियान संयोजक गणेश नेते, सहसंयोजक निखिल चरडे, नोंदणी संयोजक अविनाश महाजन, क्रिकेट संयोजक प्रशांत येग्लोपवार, व कबड्डी संयोजक नरेंद्र अल्सवार , भाजयुमो शहर अध्यक्ष अनिल तिडके, सी.एम. वॉर रूमचे निकेश कुकडे यांचेसह समितीचे पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते. 
गडचिरोली विधानसभा क्षेत्रात आमदार डॉ. देवराव होळी यांच्या पुढाकारातून व खासदार अशोक नेते यांच्या मार्गदर्शनाखाली सी.एम चषक विधानसभा स्तरीय आयोजन समिती गडचिरोलीच्या वतीने  आयोजन करण्यात येत आहे. या सी.एम चषकात क्रिकेट, व्हॉलीबॉल, कबड्डी, खो खो, कुस्ती, कॅरम, ऍथलेटिक्स, या क्रीडा स्पर्धांसह नृत्य, गायन, रांगोळी, चित्रकला व कविता या कला स्पर्धाचे आयोजन करण्यात आले आहे. विजेत्या संघांना व स्पर्धकांना प्रथम, द्वितीय व तृतीय बक्षिसांसह वैयक्तिक प्रोत्साहनपर बक्षीस मोठ्या प्रमाणात देण्यात येणार आहे. तरी या सी.एम. चषकात सहभागी होण्यासाठी तात्काळ नोंदणी करून आपला सहभाग नोंदविण्यासाठी आ. डॉ. देवराव होळी यांचे जनसंपर्क कार्यालय गडचिरोली ०७१३२-२३५६५६, चामोर्शी ०७१३५-२३६०८१, अविनाश महाजन गडचिरोली ९४२२१४५२०९३, गणेश नेते गडचिरोली ९४२१७६६१९९, अनिल तिडके गडचिरोली ८२७५४०८५०५, नरेंद्र अल्सवार  चामोर्शी ९४२३५०२४४८ यांचेशी संपर्क साधावा असे आवाहन सी.एम. चषक विधानसभा स्तरीय समिती गडचिरोली यांनी केले आहे.   Print


News - Gadchiroli | Posted : 2018-10-29


Related Photos