जनता तक्रार दरबारात खा. अशोक नेते यांनी जाणून घेतल्या शेतकरी, नागरिकांच्या समस्या


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
 प्रतिनिधी / गोंदिया :
जिल्ह्यातील सालेकसा येथे आज २९  ऑक्टोबर रोजी खासदार   अशोक  नेते यांच्या अध्यक्षतेखाली  जनता तक्रार दरबार आयोजित करण्यात आला होता. या जनता तक्रार दरबारात खा. नेते यांनी  नागरिक व शेतकऱ्यांच्या अडी-अडचणी जाणून घेऊन त्या तात्काळ सोडविण्यांच्या सूचना खासदार अशोक नेते यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या.
यावेळी प्रमुख अतिथी म्हणून आमगाव विधानसभा क्षेत्राचे आमदार संजय  पुराम, जिल्हा महामंत्री बाळाभाऊ अंजनकर, तालुका अध्यक्ष परसराम  फुंडे, महामंत्री राजेंद्र बडोले, मनोज बोपचे, आमगाव चे तालुका महामंत्री नरेंद्र  वाजपेयी, राकेश  शेंडे, आमगाव शहर अध्यक्ष घनश्याम  अग्रवाल, खेमराज लिल्हारे, शोभेलाल कटरे , बाबूलाल उपराडे, शंकर मडावी, देवराव वडगाये, प्रमिला दशरिया, कल्याणीताई कटरे, मधूताई अग्रवाल, संगीताताई कुराये, इसराम बाहेकार, प्रल्हाद वाढई, मुकेश इनवाते  व भाजपा पदाधिकारी उपस्थित होते.  Print


News - Gondia | Posted : 2018-10-29


Related Photos