चिमुर येथील मटन मार्केट हटविण्यासाठी नगर परिषद समोर केले 'ढोल बजाओ' आंदोलन


- मुख्याधिकारी मनोज कुमार शाह यांनी केली उपविभागीय अधिकाऱ्यांकडे तक्रार 
विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / चिमूर :
   नगर परिषदच्या प्रभाग क्र १२ मधील मटन व चिकन मार्केट हटविण्याची मागणी चिमुर युवा क्रांती संघटनेचे स्वंस्थापक अध्यक्ष विनोद शर्मा यांनी २२ ऑक्टोबर ला निवेदनाद्वारे केली होती. या मागणीचे निराकरण  न झाल्यामुळे आज  २९ ऑक्टोबर रोजी  नगर परिषद समोर विनोद शर्मा यांनी ढोल बजाओ आंदोलन करुण नगर परिषद चे डोळे उघडण्याचा प्रयत्न केला.  मटन व  चिकन मार्केटला लागूनच प्राथमिक उर्दू शाळा असल्यामुळे मुलांचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता आहे. तरी नगर परिषद दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप विनोद शर्मा यांनी केला आहे. 
या संदर्भात चिमुर नगर परिषद चे मुख्याधिकारी मनोज कुमार शाह यांनी आज  २९ ऑक्टोबर रोजी युवा क्रांती संघटनेचे अध्यक्ष विनोद शर्मा यांनी नगर परिषद कार्यालय समोर ढोल बजाओ आंदोलन सुरु केल्याने प्रचंड ढोलाच्या आवजमुळे २ तास नगर परिषद कार्यालयात कोणतेही काम होउ शकले नाही.  त्यामुळे कोणतीही पूर्व परवानगी  न घेता शासकीय कामात अडथळा आणल्या  प्रकरणी फौजदारी कार्यवाही कर्णयसंदर्भात जिल्हाधिकारी,  चंद्रपुर पोलिस अधीक्षक चंद्रपुर व उपविभागीय पोलिस अधिकारी चिमुर यांच्याकडे तक्रार दाखल केली आहे.   Print


News - Chandrapur | Posted : 2018-10-29


Related Photos