महत्वाच्या बातम्या

 वर्धा येथे चाचा नेहरू बाल महोत्सव उत्साहात संपन्न


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / वर्धा : जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालयांतर्गत शासकीय व स्वयंसेवी संस्थांच्या बालगृहात मुलांच्या पुनर्वसनासाठी दाखल असलेल्या बालकांमधील सुप्त गुणांना वाव देण्यासाठी तिन दिवशीय बाल महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या महोत्सवाचे उद्घाटन जिल्हा पोलिस अधीक्षक नुरुल हसन यांच्या हस्ते झाले. बालकांच्या उत्साहपुर्ण सहभागाने हा महोत्सव पार पडला.

श्रीछाया बालगृह वर्धाच्या प्रांगणात आयोजित या महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी बाल कल्याण समितीच्या अध्यक्षा स्मिता बढीये, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी प्रशांत विधाते, सदस्य परमानंद उईके, कविता काळसर्पे, बाल न्याय मंडळ सदस्या अलका भुगुल, उष:काल महिला बहुद्देशीय शिक्षण सेवा प्रसारक मंडळाच्या अध्यक्षा उषा फाले, जिजामाता शाळेचे प्राचार्य वाघमारे, समीर बेटावदकर, रमेश दडमल, कल्याणकुमार रामटेके, एस. के. वाघमारे, आशिष पोहाने उपस्थित होते.

बालकांमध्ये एकमेकाविषयी बंधुभाव, सांघिक भावना निर्माण व्हावी, त्यांचा सर्वांगीण विकास होण्यासाठी या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असल्याचे याप्रसंगी विधाते यांनी सांगितले. महोत्सवामध्ये कबड्डी, दौड, गोळा फेक, थाळी फेक, चित्रकला, निबंध, वकृत्व, लंगडी, कबड्डी, सामुहिक एकल नृत्य, सामुहिक नृत्य, सांस्कृतिक कार्यक्रमात अशा स्वरुपाच्या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.

महोत्सवाच्या समारोपिय कार्यक्रमाची सांगता बालकांच्या उत्साहवर्धक वातावरणामध्ये पार पडले. जिल्ह्यातील विविध शाळेतील व बालगृहातील बालकांनी बाल महोत्सवात उस्फुर्त प्रतिसाद दिला. समारोपिय कार्यक्रमात विजयी झालेल्या बालकांना पारीतोषिक व प्रमाणपत्र तसेच सहभगी झालेल्या बालकांना प्रमाणपत्र वितरीत करण्यात आले.

समारोपाला जिल्हा कार्यक्रम अधिकारी सुनील मेसरे, विधी सेवा प्राधिकरणच्या अधीक्षक श्रीमती कुबडे, बाल न्याय मंडळचे सदस्य गजानन जंगमवार, बाल कल्याण समिती सदस्य ममता बालपांडे, छोटू बोरीकर, किशोर खडगी, स्वप्नील मानकर, शिवाजी चौधरी, दिपाली परमार, संरक्षण अधिकारी अतुल चौधरी, रामेश्वर राठोड, वैभव राऊतराय, प्रफुल मेश्राम, गौरव हजारे, नितिन जुगनाके, प्रियंका झोटींग, राजु वानखडे, महेंद्र तायडे, रामस्वरुप भोयर, जिल्हा बाल संरक्षण कक्षाचे अधिकारी वैशाली मिस्कीन, महेश कामडी, राम सोनवणे, मेघलता तमगिरे, आरती नरांजे, सचिन वाटगुळे, मनोज चौधरी, नितेश वैतागे, अमर कांबळे, अक्षय महालगावे, रेशमा रघाटाटे, आशिष भरणे उपस्थित होते.

उदघाटन कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जिल्हा बाल संरक्षण अधिकारी माधुरी भोयर यांनी केले तर आभार विधी तथा परिविक्षा अधिकारी सुनंदा हिरुडकर यांनी मानले.





  Print






News - Wardha




Related Photos