तेंदूपत्ता संकलनाकरिता गेलेल्या महिलेवर वाघाचा हल्ला : महिला जागीच ठार


- परिसरातील पाचवी घटना 

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली :
वनविभागातील वनपरिक्षेत्रात गोगाव – महादवाडी गावालगत तेंदूपत्ता संकलनाकारीत गेलेल्या महिलेवर वाघाने हल्ला करून   ठार केल्याची घटना आज १० मे रोजी सकाळी ८ वाजताच्या सुमारास घडली.  कल्पना दिलीप चुधरी (३५) असे मृतक महिलेचे नाव असून सदर परिसरातील हि पाचवी घटना आहे यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. 
गडचिरोली वनपरिक्षेत्रातील गोगाव नियतक्षेत्रात कल्पना दिलीप चूधरी (३५)  ह्या तेंदूपत्ता संकलना करीता गेल्या असता जंगलात दबा  धरून बसलेल्या वाघाने त्यांच्यावर हल्ला करीत त्यांच्या नरडीचा घोट घेतला. दरम्यान आजू बाजूच्या लोकांनी आरडाओरड केली असता वाघ जंगलात पसार झाला. सदर घटनेची  माहिती मिळताच  वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. परिसरात गस्त वाढविण्यात आली असून गावकऱ्यांना शेतात तसेच गावाला लागून असलेल्या जंगलात न जाण्याच्या सूचना देण्यात आल्या. परिसरातील हि पाचवी घटना आहे , वारंवार अश्या घटना घडल्याने  नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून भविष्यात मानव-वन्यजीव संघर्ष निर्माण होण्याची शक्यता आहे . 
दोन दिवसाअगोदरच जिल्हयातील काही भागात तेंदुपत्ता हंगाम सुरू झाला. कोरोनाने पुन्हा डोके वर काढले यामुळे राज्यभरात लाॅकडाऊन लावण्यात आला त्यामुळे रोजगार सुध्दा हिरावला, तेंदुपत्ता हंगाम सुरू झाल्याने नागरिकांच्या आशा पल्लवीत झाल्या आणि तेंदुपत्ता संकलानामुळे पोटाचा प्रश्न सोडवण्यात मदत झाली. मात्र एकीकडे कोरोनाचे संकट उराशी असतांनाच मानव वन्यजिव संघर्ष मात्र थांबता थांबेना. तेंदुपत्ता संकलनासाठी गेलेल्या महिलेवर वाघाने हल्ला करून ठार केल्याने मृतकाच्या कुटुंबावर शोककळा पसरली असून नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. एकीकडे कोरोनाची भिती तर मिळालेला हातचा रोजगार करण्यास गेले असता वाघाची भिती अशी परिस्थिती निर्माण झाली असून नागरिक चिंतेतही आहे. 
  Print


News - Gadchiroli | Posted : 2021-05-10


Related Photos