महत्वाच्या बातम्या

 आरोग्य शिबीराचे होणार आयोजन : जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर


- आरोग्य विभागाचा एकत्रित आढावा

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / भंडारा : जिल्ह्यातील नागरिकांना आरोग्य सुविधा जलद गतीने मिळाव्यात आरोग्य सुविधा देणे ही आरोग्ययंत्रणेतील प्रत्येक अधिकारी कर्मचाऱ्यांची प्रथम कर्तव्य असले पाहीजे. अश्या स्पष्ट शब्दात जिल्हाधिकारी कुंभेजकर यांनी आरोग्य विभागाच्या विषयांवरील सविस्तर बैठका काल नियोजन सभागृहात घेतल्या.

यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी एस. एम. कुर्तकोटी, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. डी. सोयाम, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मिलिंद सोमकुंवर तसेच आरोग्य, पोलीस विभाग व संबंधीत अधिकारी यावेळी उपस्थित होते.

यावेळी राष्ट्रीय आरोग्य अभियान, गर्भलिंगपूर्व निदान चाचणी, हिवताप नियंत्रण कार्यक्रम, क्षयरोग नियंत्रण कार्यक्रम, राष्ट्रीय किशोर स्वास्थ्य कार्यक्रम, प्रधानमंत्री मातृवंदना कार्यक्रम, आरोग्यवर्धिनी केंद्र, आयुषमान भारत, एकात्मिक रोग नियंत्रण कार्यक्रम, राष्ट्रीय कुष्ठरोग नियंत्रण कार्यक्रम अशा विविध बाबींचा तपशीलवार आढावा घेण्यात आला. रुग्णांना उपचारासाठी रुग्णालयांपर्यंत पोहोचवण्याची व्यवस्था, रुग्णाच्या आजाराचे लवकर निदान, औषधांची उपलब्धता आणि आहार या गोष्टी आरोग्य सेवेच्या दृष्टीने अतिशय महत्वाच्या असतात. जिल्ह्यातील शस्त्रक्रीया कक्षांच्या दुरूस्त्या लवकर पूर्ण करण्याकडे लक्ष द्यावे नवीन आणि दुरूस्त्या होत असलेल्या शस्त्रक्रीय कक्षाची कामे दर्जेदार आणि विहीत मुदतीत पुर्ण कारावी. राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रमांतर्गत प्रत्येक मुला-मुलींची तपासणी होणे आवश्यक आहे. या तपासण्या वेळेवर आणि नियमित व्हाव्यात तसेच तपासणीमध्ये मुलांमध्ये आजार व रोगांची लक्षणे आढळल्यास त्यांना नियमित उपचार आणि आहार मिळत असल्याचे सुनिश्चित करावे. अश्या सुचनाही  जिल्हाधिकाऱ्यांनी केल्या.

जिल्ह्यातील नागरिकांची विशेष काळजी घेणे ही आरोग्य यंत्रणेची प्रथम प्राथमिक्ता असते. जिल्ह्यात कर्करोग, दंतरोग, डोळे, मधुमेह, रक्तदाब तसेच इतर आजारांविषयी शिबीरे घेण्यात यावीत. उपचाराधीन रूग्णांचा पाठपुरावाही तितकाच महत्वाचा आहे. शाळा, महाविद्यालये व इतर शैक्षणिक परिसरात तंबाखूजन्य पदार्थांची विक्री होऊ नये तसेच विद्यार्थ्यांची मौखिक तपासणी आणि तंबाखू निर्मलनाबाबत विशेष मोहिम राबवून जनजागृती करावी. लहान मुले व नवजात बालकांना सर्व आवश्यक लसी विहीत मुदतीत मिळेल हे सुनिश्चित करावे. खाजगी दवाखान्यांनीही आपल्या रूग्णालयात देण्यात आलेल्या डोसेजबाबत शासनाला अवगत करावे. तसेच कोरोनाच्या लसी शंभर टक्के नागरिकांना देण्याचा उद्देश साध्य करण्यासाठी सर्व महाविद्यालये, माध्यमिक शाळा या ठिकाणी कॅम्प लावावे. आरोग्य विभागातील रिक्त पदे भरण्यासाठी यंत्रणेने पाठपुरावा करून सर्व आवश्यक पदे भरावीत. असे यावेळी जिल्हाधिकारी म्हणाले.





  Print






News - Bhandara




Related Photos