कवडसी (ड़ाक) येथे बिबट मृतावस्थेत आढळला


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
 तालुका प्रतिनिधी / चिमुर :
   तालुक्यातील शंकरपुर येथून जवळच  असलेल्या कवडसी (ड़ाक) येथील नाल्यात  आज २९ ऑक्टोबर रोजी सकाळी  बिबट मृतावस्थेत  आढळला आहे. 
चिमूर वनपरिक्षेत्रातील शंकरपूर क्षेत्र कार्यालया अंतर्गत डोमा बीटातील कवडसी (ड़ाक) या गावाला लागून असलेल्या नाल्या जवळ नागो थेटमाली यांच्या शेता जवळ वनविभागाच्या  कर्मचाऱ्यांना हा बिबट मृतावस्थेत आढळून आला आहे.  बिबट चे शरीर पूर्णपणे कुजलेल्या स्थितीत असून जवळपास १० ते १२ महिन्याचे असावे असा अंदाज आहे. बिबट्याचे  दात,  पंजे , नखे व्यवस्थित असून मृत्यू चे कारण अद्याप अस्पष्ट आहे. 
ब्रह्मपुरी चे उपवनसंरक्षक कुलराज सिंह यांच्या उपस्थितीत नागभीड चे पशुवैद्यकीय अधिकारी नगराळे यांनी शवविच्छेदन केले.  यावेळी वनपरिक्षेत्र अधिकारी भाविक चिवंडे, तरुण पर्यावरणवादी मंडळाचे आमोद गौरकर,  प्रभारी वनपाल रुपेश केदार,  वनरक्षक नवघडे,  प्रदीप ढोणे , सुनील लांजेवार,  जोगेश लांजेवार उपस्थित होते.   Print


News - Chandrapur | Posted : 2018-10-29


Related Photos