दिवाळीतील प्रवासी वाहतूक लक्षात घेऊन रापम कर्मचारी, अधिकाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / मुंबई : 
एसटी महामंडळाने दिवाळीतील प्रवासी वाहतूक लक्षात घेऊन कर्मचारी, अधिकाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द केल्या आहेत. महामंडळाने जारी केलेल्या परिपत्रकानुसार आज, २९ ऑक्टोबरपासून दिवाळी हंगाम संपेपर्यंत सुट्ट्या रद्द करण्यात आल्या आहेत. 
दिवाळी हंगामात एसटीतील प्रवाशांची संख्या वाढते. नेमक्या याच कालावधीत तात्पुरती भाडेवाढ करून महसूलवाढीचा प्रयत्न केला जातो. मात्र गेल्या वर्षी दिवाळीच्या काळातच एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला होता. दिवाळीकाळात आंदोलन झाल्यास राज्यभरातील प्रवासी त्यात भरडून निघतात. यंदा एसटी महामंडळाने कर्मचारी संघटनांच्या उपोषण, आंदोलनाच्या इशाऱ्याची गंभीर दखल घेतली आहे. त्या अनुषंगाने महामंडळाने दिवाळी हंगाम संपेपर्यंत सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भातील परिपत्रकात सुट्टीवर गेलेले कर्मचारी, अधिकाऱ्यांना कामावर रुजू करून घेण्याबाबतही स्पष्ट सूचना दिल्या आहेत. एसटीने राज्यातील विभागीय कार्यालये, आगारांमध्ये परिपत्रक रवाना केले आहे.   Print


News - Rajy | Posted : 2018-10-29


Related Photos