जकार्तात विमान समुद्रात कोसळले, शेकडो प्रवासी दगावल्याची भीती


वृत्तसंस्था / इंडोनेशिया :  इंडोनेशियाची राजधानी जकार्ताहून भारतीय वेळेनुसार सकाळी ६.१५ वाजण्याच्या सुमारास उड्डाण केलेले विमान समुद्रात कोसळले आहे. लायन एअर कंपनीचे हे विमान अपघातग्रस्त झाले असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. 
जकार्ताहून 'लायन एअर'च्या 'बोईंग ७३७ मॅक्स ८' या विमानाने पान्गकल पिनांगकडे जाण्यासाठी उड्डाण केले. उड्डाणाच्या अवघ्या १३ मिनिटानंतर विमानाचा नियंत्रण कक्षाशी संपर्क तुटला. विमानाशी संपर्क तुटल्याची माहिती समोर आल्यानंतर विमानासाठी शोध मोहीम आणि बचाव कार्य सुरू करण्यात आले. जावा समुद्राच्या किनारी विमानाचे काही भाग आढळून आले असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. 
विमानात प्रवासी व क्रुसह क्षमता १८८ जणांची असून अपघातग्रस्त विमानात किती प्रवासी होते याची माहिती अद्याप समोर आली नाही. या अपघाताबाबत तूर्तास काही माहिती देवू शकत नसल्याचे लायन एअरने म्हटले आहे.   Print


News - World | Posted : 2018-10-29


Related Photos