मेहा बुज. येथील इसमाची गळफास घेवून आत्महत्या


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / पाथरी (सावली) :
सावली तालुका मुख्यालयापासून नजीकच असलेल्या तसेच पाथरी पोलिस ठाण्यांतर्गत येत असलेल्या मेहा बुज. येथील एका इसमाने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना काल २७ आॅक्टोबर रोजी दुपारच्या सुमारास घडली. 
सिध्दार्थ सावजी भैसारे (४५) रा. मेहा बुज. असे मृतकाचे नाव आहे. प्राप्त माहितीनुसार सिध्दार्थ भैसारे याचा पत्नीसोबत घरगुती वाद होता. घटनेच्या दिवशी काल २७ आॅक्टोबर रोजी त्याने शेतात जावून गळफास घेतला. त्याच्या पश्चात एक मुलगी, दोन मुले, पत्नी असा बराच मोठा आप्तपरिवार आहे. मृतकाला दोन एकर  शेती असल्याचे बोलल्या जात आहे. घटनेची माहिती मिळताच पाथरी पोलिस ठाण्याचे ठाणेदार जावेद शेख यांनी घटनास्थळी जावून पंचनामा केला. प्रेत सावली ग्रामीण रूग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी पाठविण्यात आले. पुढील तपास पाथरी पोलिस करीत आहेत.

   Print


News - Chandrapur | Posted : 2018-10-28


Related Photos