ऑक्सिजन पुरवठ्याचे व्यवस्थापन जमत नसेल तर आयआयटी आणि आयआयएम कडे द्या : दिल्ली हायकोर्ट केंद्र सरकारवर बरसले


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
: दिल्लीसह देशातील अनेक राज्यांमध्ये ऑक्सिजनचा अजूनही मोठा तुटवडा  आहे. यावरून दिल्ली हायकोर्टाने  केंद्र सरकार कडक शब्दांमध्ये ताशेरे ओढले. संपूर्ण देशात नागरिक ऑक्सिजनसाठी रडत आहेत. नागरिकांचे जीव जात आहेत. तुम्ही कसे काय इतके असंवेदनशील होऊ शकता? लोकांच्या भावनेशी याचा संबंध आहे. अनेकाचे प्राण धोक्यात आहेत. तरीही तुम्ही डोळझाक करता. पण आम्ही असे  करणार नाही, असे  म्हणत दिल्ली हायकोर्टाने केंद्र सरकाराला फटकारले .
ऑक्सिजन पुरवठ्याचे व्यवस्थापन IIT आणि IIM कडे द्या. ते तुमच्यापेक्षा उत्तम काम करतील. यात IIM च्या तज्ज्ञांना आणि बुद्धीवंतांचाही समावेश केला पाहिजे. दिल्लीतील मायाराम हॉस्पिटलकने दाखल केलेल्या याचिकेवरील सुनावणीवेळी कोर्टाने ही टिपणी केली.
महाराष्ट्रात ऑक्सिजनची मागणी आता कमी आहे. अशा परिस्थितीत महाराष्ट्राला करण्यात येणारा ऑक्सिजनचा पुरवठ्यात कपात करावी. ऑक्सिजन साठवता येऊ शकतो. यामुळे आपत्कालीन स्थिती नागरिकांचे प्राण वाचवण्यास मदत होईल, असे ॲमिक क्युरीकडून कोर्टात सांगण्यात आले. यावरून कोर्टाने केंद्राला फटकारले . दिल्लीला ७०० मेट्रीक टन ऑक्सिजनचा पुरवठा करण्यास सांगितले आहे. कुठल्याही परिस्थितीत हा पुरवठा झालाच पाहिजे, असे  कोर्टाने म्हटले आहे 
दिल्ली हायकोर्टात गेल्या आठवड्यात शनिवारी झालेल्या सुनावणी कोर्टाने कडत शब्दांत ताशेरे ओढले होते. पाणी आता डोक्याच्या वर गेले आहे. आता आम्हाला कामाशी मतलब आहे. प्रत्येक गोष्टीची व्यवस्था केली पाहिजे. कुठल्याही स्थितीत दिल्ली ऑक्सिजनचा पुरेसा पुरवठा झाला पाहिजे. असे  न केल्यास कोर्टाच्या अवमानने प्रकरणी कारवाई केली जाईल, असे  हायकोर्टाने बजावले  होते.
  Print


News - World | Posted : 2021-05-04


Related Photos