हैदराबाद संघात कोरोनाचा शिरकाव झाल्याने आयपीएलचे यंदाचे पर्व रद्द : राजीव शुक्लांचे स्पष्टीकरण


विदर्भ न्यूज एस्क्प्रेस 
वृत्तसंस्था / मुंबई :
काही दिवसांपूर्वी हैदराबाद संघातील खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्यानंतर आयपीएलचे सामने होणार की नाही? असा प्रश्न उपस्थित झाला होता. मात्र यावर बीसीसीआयचे राजीव शुक्ला यांनी मोठे स्पष्टीकरण दिले आहे.
राजीव शुक्ला यांनी दिलेल्या माहितीनुसार, आता सुरू असलेल्या आयपीएलचं पर्व सध्या तरी इथे थांबवण्यात येत आहे. परंतु पुन्हा हे सामने कधी घेतले जातील याच्याबद्दलची माहिती त्यांनी दिलेली नाही. कोरोनामुळे सर्वच क्षेत्रांवर मोठ्या प्रमाणात परिणाम होत असताना पाहायला मिळत आहेत.
महाराष्ट्रासह देशभरात कोरोनाचे रुग्ण संख्या झपाट्याने वाढत असतानाच अनेक परदेशी खेळाडूंनी आयपीएल सोडून मायदेशी परतण्याचा निर्णय यापूर्वीच घेतला होता. त्यानंतर आता हैदराबाद संघामध्ये कोरोनाने शिरकाव केल्यानंतर आयपीएलचे या सिझनचे सामने थांबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
  Print


News - Rajy | Posted : 2021-05-04


Related Photos