चारचाकी वाहनासह ६ लाख ३० हजारांचा मुद्देमाल जप्त


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली :
मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार सापळा कारवाई करत वैरागड ते मेंढेबोडी मार्गावर अवैध रित्या दारूची वाहतुक करणाऱ्या चारचाकी वाहनासह ६ लाख ३० हजारांचा अवैध देशी दारूचा साठा जप्त करण्यात आल्याची कारवाई काल ३ मे रोजी करण्यात आली. यातील आरोपी फरार असल्याने त्याचा शोध घेणे सुरू आहे.
प्राप्त माहितीनुसार, स्थानिक गुन्हे शाखेकडे जिल्हयातील अवैध धंदयांवर अकुश लावण्याकरिता पोलीस अधिक्षक अंकित  गोयल यांनी जबाबदारी सोपविली आहे. दिलेली जबाबदारी पार पाडत असतांना काल ३ मे रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक उल्हास भुसारी यांच्या आदेशाने पोलीस पथक दारू रेड करण्याकरिता गडचिरोली,आरमोरी, देसाईगंज परिसरात गस्त करीत असतांना अवैध दारू विक्रेते हे गोंदिया जिल्हयातून वैरागड मार्गे अवैध दारूची तस्करी करर असल्याची खबरेकडून गोपनीय माहिती मिळाली असता अपर पोलीस अधिक्षक समीर शेख यांच्या आदेशाने व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे निलकंठ पेंदाम, शुक्राचारी गवई, सुनिल पुठ्ठावार, मंगेश राउत, शेषराज नैताम यांनी अवैध दारू रेड कारवाई करिता दोन स्थानिक पंचांना सोबत घेवून मिळालेल्या माहितीच्या आधारे वैरागड ते मेंढेबोडी मार्गावर सापळा रचुन बसले असता एम.एच. १२ केएन- ९५४४ क्रमांकाची  चारचाकी वाहन संशयास्पदरित्या येतांना दिसले. त्या चारचाकी वाहनाला हात दाखवून थांबविण्याचा इशारा केला असता चारचाकी वाहनाच्या चालकाला पोलीस असल्याचा संशय आल्याने वाहन काही अंतरावर थांबवून अंधाराचा फायदा घेवून पळ काढला. सदर चारचाकी वाहनाची झडती घेतली असता त्यामध्ये २ लाख ८० हजार रूपयांचा अवैध देशी दारूचा मुद्देमाल  आढळून आला तसेच दारूची वाहतूक करण्याकरिता वापरण्यात आलेली चारचाकी वाहन किंमत ३ लाख ५० हजार रूपये असा एकुण ६लाख ३० हजारांचा मुद्देमाल घटनास्थळावरून जप्त करून ताब्यात घेण्यात आला. व अज्ञात आरोपीविरूध्द पोलीस स्टेशन आरमोरी येथे महा.दारूबंदि कायदयांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
सदर करावाईमुळे अवैध दारूची वाहतुक करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे.

 
  Print


News - Gadchiroli | Posted : 2021-05-04


Related Photos