पाकिस्‍तान मधील माजी न्यायाधीशाच्या नावावर २२०० हून अधिक कारची नोंद


विदर्भ न्यूज एक्सप्रेस  
वृत्तसंस्था / नवीदिल्ली :
पाकिस्‍तानमधील एका माजी न्यायाधीशाच्या नावावर २२०० हून अधिक कारची नोंदणी असल्याची माहिती समोर आली आहे. सिकंदर हयात असं या माजी न्यायाधीशाचं नाव आहे. याबाबत सिकंदर हयात यांनाच माहिती नव्हती, असं समजतं. पाकिस्तानचे प्रमुख वृत्तपत्र डॉनने याबाबचे वृत्त प्रकाशित केले आहे.
हयात यांनी आतापर्यंत केवळ एकच कार खरेदी केली असल्याची माहिती हयात यांचे वकील मियां जफर यांनी सर्वोच्च न्यायालयात दिली. हयात यांची स्वतःची एकच कार असताना त्यांच्या नावार तब्बल २२२४ कारची नोंदणी असल्याचं मियां जफर यांनी न्यायालयात सांगितलं. मियां जफर यांनी न्यायालयात सांगितलं की, ‘काही दिवसांपूर्वी हयात यांच्या नावे एक चलान पाठवण्यात आलं होतं. पण, ज्या कारचं हे चलान होतं ती कार त्यांनी खरेदीच केली नव्हती. त्यानंतर पंजाब एक्साइज अँड टॅक्सेशन डिपार्टमेंटकडे त्यांनी याबाबतची माहिती मागितली. त्यावेळी सिकंदर हयात हे २२२४ वाहनांचे नोंदणीकृत मालक असल्याचं समजलं’.
पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाने याप्रकरणी पंजाब एक्साइज अँड टॅक्सेशन डिपार्टमेंटचे सचिव आणि संचालकांना याबाबत एका आठवड्याच्या आत उत्तर देण्यास सांगितलं आहे.    Print


News - World | Posted : 2018-10-28


Related Photos