महत्वाच्या बातम्या

 विद्यापीठ, बोर्ड परीक्षा कामकाजावर बहिष्कार : २ फेब्रुवारीपासून शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे आंदोलन


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
वृत्तसंस्था / मुंबई : राज्यातील महाविद्यालयीन व विद्यापीठांतील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी येत्या २ फेब्रुवारीपासून विद्यापीठ आणि बोर्डाच्या दहावी-बारावी परीक्षांच्या कामकाजावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. सातवा वेतन आयोग लागू करण्याबरोबरच इतर विविध मागण्यांसाठी विद्यापीठ व महाविद्यालयीन सेवक संयुक्त कृती समितीच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनाचा फटका परीक्षांना बसण्याची भीती आहे. कृती समितीने आंदोलनाचे टप्पे निश्चित केले असून १६ फेब्रुवारी रोजी एक दिवसाचा लाक्षणिक संप पुकारण्यात येणार आहे. या संपाची राज्य सरकारने दखल न घेतल्यास २० फेब्रुवारीपासून बेमुदत संप करण्यात येणार आहे. याच कालावधीत बारावीच्या परीक्षांना सुरुवात होणार असल्याने संपाचा फटका बारावीच्या विद्यार्थ्यांना बसणार आहे. कल्याण येथील के. एम. अग्रवाल महाविद्यालयात झालेल्या संयुक्त कृती समितीच्या बैठकीत आंदोलनाचा निर्णय घेण्यात आला. गेल्या पाच वर्षांपासून विद्यापीठ व महाविद्यालयीन संघटनांनी स्वतंत्रपणे आंदोलने केली होती. परंतु आश्वासना शिवाय विद्यापीठ व महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचाऱयांच्या कोणत्याही मागण्या मान्य झाल्या नाहीत. त्यामुळे प्रथमच विद्यापीठ व महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचारी एकत्र आले आहेत. विद्यापीठ व महाविद्यालयीन सेवक संयुक्त कृती समितीचे प्रमुख संघटक अजय देशमुख व प्रमुख सल्लागार डॉ. आर. बी. सिंह यांनी याबाबत माहिती दिली. सेवा अंतर्गत सुधारित आश्वासित प्रगती योजनेचा रद्द केलेले शासन निर्णय पूर्ववत लागू करा. सातव्या वेतन आयोगातील तरतुदी नुसार १०.२०.३० वर्षांनंतरच्या लाभाची योजना विद्यापीठीय व महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचाऱयांना लागू करा. सातव्या वेतन आयोगापासून वंचित असलेल्या १४१० विद्यापीठीय शिक्षकेतर कर्मचाऱयांना सातवा वेतन आयोग लागू करा. विद्यापीठ व महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचाऱयांची रिक्त असलेली पदे भरण्यास मान्यता द्या. २००५ नंतर सेवेत रुजू झालेल्या कर्मचाऱयांना जुनी पेन्शन योजना लागू करा.





  Print






News - Rajy




Related Photos