दिलासादायक : गत २४ तासात देशात ३ लाखांहून अधिक रुग्ण झाले बरे, नव्या रुग्णांतही घट


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
वृत्तसंस्था / मुंबई : 
गेल्या काही दिवसांत कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना आज थोडासा दिलासा मिळाला आहे. गेल्या 24 तासांत तीन लाखहून अधिक रुग्ण बरे झाले आहेत. तर कोरोना लागण होण्याच्या रुग्णांतही घट झाली आहे.
गेल्या 24 तासात देशात 3 लाख 7 हजार 865 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर गेल्या 24 तासात देशात 3 लाख 92 हजार 488 रुग्ण सापडले आहेत. गेल्या 24 तासात 3 हजार 689 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या देशात 33 लाख 49 हजार 644 सक्रिय रुग्ण असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
शुक्रवारी देशात सर्वाधिक म्हणजे चार लाखहून अधिक रुग्ण आढळले होते. जगात एकाच दिवशी हिंदुस्थानात सर्वाधिक रुग्ण आढळले होते. सद्य आकडेवारीनुसार हिंदुस्थानात मृत्यूदर सर्वधिक आहे. जगातील प्रत्येक चौथा मृत्यू हा आपल्या देशात होत आहे.
  Print


News - World | Posted : 2021-05-02


Related Photos