महत्वाच्या बातम्या

 महालक्ष्मी शारदा महिला मंडळ गडचिरोली तर्फे हळदी कुंकवाचा कार्यक्रम संपन्न


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / गडचिरोली : महालक्ष्मी शारदा महिला मंडळ कॅम्प एरियाच्या वतिने या वेळेस पहिल्यांदाच मकर संक्रांतीनिमित्त हळदी कुंकवाचा कार्यक्रम 17 जानेवारी 2023 ला सारिका बोमनवार यांच्या घरासमोर ओपन स्पेस गार्डनमध्ये महिलांनी मकर संक्रांतीचे औचित्य साधून हळदी कुंकवाचा कार्यक्रम मोठ्या संख्येने उपस्थित राहून मोठ्या उत्साहाने साजरा केला.

नव्या वर्षाचा पहिला सण आणि सर्वांचा आवडता सण मकर संक्रांती तिळगुळ वाटणे असा हा रंगबिरंगी आपल्या आयुष्यात नवीन उत्साह घेऊन येतो. त्या निमित्ताने स्त्रीशक्ती हळदी कुंकवाचे कार्यक्रम, विविध कलागुणांना वाव, सांस्कृतिक कार्यक्रम घेऊन सुप्त गुणांना वाव देता येते. यावेळेस विविध स्पर्धा घेऊन प्रथम आणि द्वितीय पारितोषिक याठिकाणी देण्यात आले. कार्यक्रमाचे आयोजन महालक्ष्मी शारदा मंडळ अध्यक्ष सारिका बोमनवार आणि सर्व सदस्य यांनी घेतले. तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ वर्षा शनीवारे यांनी केले. याप्रसंगी मोठ्या संख्येने महिलांनी उपस्थित राहून आनंद द्विगणित  केला.





  Print






News - Gadchiroli




Related Photos