महत्वाच्या बातम्या

 ३१ जानेवारी पासुन मनपा शिक्षण विभागाचे शालेय क्रीडासत्र


- १७०० विद्यार्थ्यांचा सहभाग 

- मनपा शिक्षक व अधिकारी - कर्मचारी यांत रंगणार क्रिकेट सामना 

- मनपा कर्मचाऱ्यांच्या सांस्कृतीक कलागुणांनाही मिळणार वाव 

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / चंद्रपूर : शरीर स्वाथ्यासाठी मैदानी खेळांचा परिपाठ गिरविणे आवश्यक आहे. शरीर मजबुत होण्याबरोबरच मानवी जीवनात शिस्त, धैर्य, साहस, आत्मविश्वास वृद्धिंगत होण्यासाठी शालेय विद्यार्थ्यांमंध्ये खेळांची आवड निर्माण होणे गरजेचे आहे. शालेय क्रीडा महोत्सवात विद्यार्थ्यांच्या कलागुणांच्या होणाऱ्या कौतुकामुळे त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण होतो. मनपा शाळांचे शालेय क्रीडासत्र ३१ जानेवारीपासुन सुरु होत असुन या क्रीडासत्रात विद्यार्थ्यांनी आनंदाने भाग घ्यावा व विद्यार्थ्यांना आनंद, उत्साह मिळेल या दृष्टीने सत्राचे आयोजन करण्याचे निर्देश आयुक्त विपीन पालीवाल यांनी दिले. 

मनपा शालेय क्रीडासत्र २०२२-२३ संबंधी कार्यवाहक मंडळाची बैठक १८ जानेवारी रोजी मनपा स्थायी समिती सभागृहात आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या क्रीडासत्रात मनपाच्या २७ शाळांचे १६०० ते १७०० विद्यार्थी सहभागी होणार आहेत. ३ दिवसीय क्रीडासत्रात मनपा शाळांचा प्रत्येक विद्यार्थी सहभागी व्हावा या दृष्टीने प्रयत्न केले जातात. खो-खो, कबड्डी, गोळा फेक, रीले, रेस इत्यादी विविध मैदानी खेळ यात खेळले जातात. मैदानी खेळानंतर प्रियदर्शिनी इंदिरा गांधी सभागृहात सांस्कृतीक कार्यक्रमांचे देखील आयोजन करण्यात येते. खेळांमध्ये विजेत्या शाळेला ट्रॉफी तर विजेत्या विद्यार्थ्यांना मेडल व इतर उपयोगी वस्तु तर सहभागी विद्यार्थ्यांनी प्रमाणपत्र देण्यात येते. 

मुलांच्या विविध कलागुणांना वाव मिळावा याकरिता मनपा क्रीडासत्र दरवर्षी आयोजित करते. कोरोना प्रादुर्भावामुळे सन २०२०-२१ व २०२१-२२ या कालावधीत क्रीडा स्पर्धेचे आयोजन होऊ शकले नाही. मनपा शाळांमधील मुले गरीब घरची आहेत. महानगरपालिका कुठलीही फी न आकारता त्यांना उच्च दर्जाचे शिक्षण देण्याचा प्रयत्न करते आहे. मध्यान्न भोजनाच्या रूपात पोषक आहार विद्यार्थ्यांना दिला जातो. विद्यार्थ्यांमधे बौद्धिक व खेळगुण विकसित करण्यास मनपा शिक्षक प्रयत्नशील आहेत.

विद्यार्थ्यांना योग प्रशिक्षणाचे धडे सुद्धा दिले जाणार असुन यंदा मनपा शिक्षक व अधिकारी - कर्मचारी यांत क्रिकेट सामना सुद्धा रंगणार असुन आयुक्त विपीन पालीवाल यांच्या संकल्पनेतुन यंदा प्रथमच मनपा कर्मचाऱ्यांच्या त्यांच्या सांस्कृतीक कलागुणांनाही वाव देण्याची संधी मिळणार आहे. अधिकारी कर्मचारी यांच्यात योग्य समन्वय साधण्याच्या दृष्टीने तसेच कार्यालयीन ताण तणावापासुन काही क्षण विरंगुळ्याचे म्हणुन प्रियदर्शिनी इंदिरा गांधी सभागृहात मनपा अधिकारी कर्मचाऱ्यांसाठी सांस्कृतीक कार्यक्रमाचे आयोजन केले जाणार आहे.          

याप्रसंगी सहायक आयुक्त विद्या पाटील, प्रशासन अधिकारी नागेश नीत, प्रमुख कार्यवाह वामन कुमरे, सय्यद शहजाद, अरुण वलके, मधुकर मडावी, शरद शेंडे, रवींद्र गोरे, सुनील आत्राम, राजकुमार केसकर, अमोल कोटनाके, प्रशांत आकनुरवार, शिवलाल इरपाते, भुषण बुरटे, संदीप जवादवार, सुचिता मालोदे, संजना पिंपळशेंडे, परिणय वासेकर, बबिता उईके, उमा कुकडपवार, स्वाती बेत्तावर, विद्यालक्ष्मी कुंडले उपस्थीत होते.





  Print






News - Chandrapur




Related Photos