मेक इन गडचिरोलीतील व्यवसाय नाबार्डच्या योजनेत सहभागी करून घेण्याबाबत नाबार्डच्या अधिकाऱ्यांशी चर्चा


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली :
आमदार डाॅ. देवराव होळी यांच्या नेतृत्वात गडचिरोली जिल्ह्यात मेक इन गडचिरोली ही संकल्पना राबविण्यात येत आहे. या अंतर्गत १०० उद्योजक निर्मितीचा संकल्प त्यांनी केला. यातील दुग्धव्यवसाय, पोल्ट्री  लेयर, मत्स्यव्यवसाय तसेच इतर काही व्यवसाय नाबार्डच्या योजनेत सहभागी करून घेण्याबाबत नाबार्डच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करण्यात आली.
मेक इन गडचिरोली अंतर्गत व्यवसाय निर्मितीसाठी १०० उद्योगांची निवड करण्यात आली आहे. जिल्ह्यातील उद्योजकांना याचा लाभ देता यावा यासाठी डिक्कीचे अध्यक्ष पद्मश्री मिलींद कांबळे यांच्या उपस्थितीत नाबार्डचे व्यवस्थापकीय संचालक श्रीवास्तव व वरीष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेण्यात आली. यावेळी मेक इन गडचिरोलीचे प्रोजेक्ट डिझायनर डी. श्रीनिवास, राजु दासरपवार, सी. जीवन, मेक इन गडचिरोलीचे जिल्हा संयोजक रमेश अधिकारी व मान्यवर उपस्थित होते.

   Print


News - Gadchiroli | Posted : 2018-10-28


Related Photos