गडचिरोली जिल्ह्यातील शिक्षक देणार कोविड -१९ व्यवस्थापनाकरिता १ दिवसाचे वेतन


-  जवळपास १ कोटी चे जिल्हा प्रशासनाला सहकार्य

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली :
सध्या संपूर्ण जग कोविड-१९ च्या महामारीच्या संकटात आहे. गावपातळीपासून ते जगापर्यंत आपण सर्व या संकटाचा सामना करीत आहोत. आणि आपण यात निश्चितच विजय मिळवू यात शंका नाही.
महाराष्ट्र प्रमाणे गडचिरोली जिल्ह्यातही सध्या कोरोनाचे थैमान सुरू आहे, रुग्णांचा प्रचंड ताण आहे, या सर्व परिस्थितीवर मात करून प्रशासन ही महामारी नियंत्रणात आणण्याचा कसोशीने प्रयत्न करीत आहे. त्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून मदतीकरिता गडचिरोली जिल्हातील सर्व शिक्षक संघटनांनी पुढाकार घेतला आहे. शिक्षक समाजाचा एक घटक असून सामाजिक कर्तव्यात नेहमी अग्रेसर आहे हीच शृंखला पुढे ठेवत, समाजीक भावनेने व कर्तव्य जाणिवेतून, जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेला साहाय्य म्हणून जिल्ह्यातील सर्व शिक्षक एक दिवसाचे  वेतन जिल्ह्यातील कोविड -१९ व्यवस्थापन करिता देण्याचे निश्चित केले आहे  त्या संबंधी कार्यवाही करीत मुख्यकार्यकारी अधिकारी यांची प्रत्यक्ष भेट घेऊन एक दिवसाचे वेतन कपात करण्याबाबतचे निवेदन सादर केले आहे.
या महामारीच्या काळात प्रशासनला सहाय्य म्हणून व सामाजिक  कर्तव्य म्हणून मार्च २०२१  च्या वेतनातून १ दिवसाचे वेतन कपात करण्यात येऊन प्रशासनाला मदत केली जाणार  असून जवळपास १ कोटी रुपये एवढी रक्कम जमा केली जाणार आहे. संकटाच्या काळात शिक्षक संघटनेने घेतलेल्या या निर्णयाचे स्वागत हाेत आहे. इतरही कर्मचारी संघटनांनी यासाठी पुढाकार घेण्याची गरज आहे.या उपक्रमाला जिल्हातील सर्व शिक्षक संघटनांनि प्रत्यक्ष  सहभाग दाखविला असून शिक्षकांनी एकमताने असा निर्णय घेऊन संपूर्ण शिक्षकांची वज्रमूठ  बांधली आहे.
निवेदन देतांना प्राथमिक शिक्षक संघटनेचे समन्वय समीतीचे मुख्य निमंत्रक अनिल मुलकलवार, जिल्हासमन्वयक रघुनाथ भांडकेर, विजय बन्सोड, धनपाल मिसार, चक्रपाणी कन्नाके, विजय साळवे, किशोर कुरवटकर, लालचंद धाबेकर, गुरूदेव नवघडे, देवेंद्र लाांजेवार, बापु मुनघाटे, गोपाल डे आदि पदाधिकारी उपस्थित होते.
  Print


News - Gadchiroli | Posted : 2021-04-29


Related Photos