गडचिरोली जिल्ह्यात आज २१ मृत्यूसह आढळले ६२२ नवे बाधित तर २८९ कोरोनामुक्त


विदर्भ  न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली : 
आज जिल्हयात 622 नवीन कोरोना बाधित आढळून आले. तसेच आज 289 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले. यामुळे जिल्हयातील आत्तापर्यंत बाधित 20097 पैकी कोरोनामुक्त झालेली संख्या 15047 वर पोहचली. तसेच सद्या 4678 सक्रिय कोरोना बाधितांवर उपचार सुरू आहेत. आत्तापर्यंत जिल्हयात एकुण 372 जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याची नोंद आहे. आज 21 नवीन मृत्यूमध्ये 40 वर्षीय पुरुष कोजबी ता.आरमोरी,  50 वर्षीय पुरुष ता.आरमोरी,  67 वर्षीय पुरुष ता.कुरखेडा, 52 वर्षीय महिला नवेगाव गडचिरोली, 52  वर्षीय पुरुष गडचिरोली, 70 वर्षीय महिला रामपूरी वार्ड गडचिरोली, 44 वर्षीय पुरुष रामनगर गडचिरोली, 62  वर्षीय पुरुष शंकरनगर गडचिरोली,  56 वर्षीय पुरुष बेलगाव ता.कोरची , 54 वर्षीय पुरुष माता मंदिर गोकूल नगर गडचिरोली, 61 वर्षीय पुरुष वडसा, 40 वर्षीय पुरुष  कुड्डीरामपल्ली ता.मुलचेरा , 50 वर्षीय पुरुष गोविंदपूर गडचिरोली , 68 वर्षीय पुरुष गडचिरोली, 46 वर्षीय महिला रामनगर गडचिरोली, 54 वर्षीय पुरुष आरमोरी, 50 वर्षीय पुरुष आरमोरी, 53 वर्षीय पुरुष ता.वडसा, 62 वर्षीय पुरुष ता.ब्रम्हपूरी जि.चंद्रपूरी , 65 वर्षीय पुरुष जारावंडी ता.एटापल्ली, 64 वर्षीय पुरुष धानोरा,  यांचा नवीन मृत्यूमध्ये समावेश आहे. यामूळे जिल्हयातील कोरोना रूग्ण बरे होण्याचे प्रमाण 74.87 टक्के, सक्रिय रूग्णांचे प्रमाण 23.28 टक्के तर मृत्यू दर 1.85 टक्के झाला.
नवीन 622 बाधितांमध्ये गडचिरोली तालुक्यातील 182, अहेरी तालुक्यातील 38, आरमोरी 46, भामरागड तालुक्यातील 18, चामोर्शी तालुक्यातील 33, धानोरा तालुक्यातील 26, एटापल्ली तालुक्यातील 36, कोरची तालुक्यातील 42, कुरखेडा तालुक्यातील बाधितामध्ये 41, मुलचेरा तालुक्यातील बाधितामध्ये 23, सिरोंचा तालुक्यातील बाधितामध्ये 50 तर वडसा तालुक्यातील बाधितामध्ये 87 जणांचा समावेश आहे. तर आज कोरोनामुक्त झालेल्या 289 रूग्णांमध्ये गडचिरोली मधील 173, अहेरी 09,  आरमोरी 34, भामरागड 00, चामोर्शी 11, धानोरा 08 , एटापल्ली 05, मुलचेरा 07, सिरोंचा 02, कोरची 07, कुरखेडा 14, तसेच वडसा येथील 19  जणांचा समावेश आहे. 
  Print


News - Gadchiroli | Posted : 2021-04-28


Related Photos