महत्वाच्या बातम्या

 बदलत्या युगात व स्पर्धेच्या काळात टिकायचे तर स्वतःला सिध्द करा : गटशिक्षणाधिकारी नरेंद्र कोकुडे


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

तालुका प्रतिनिधी / आरमोरी : २१ व्या शतकात विध्यार्थी गुणवत्तासाठी नवनवीन अध्ययन अध्यापनाच्या पध्दती वापरल्या जात असुन तंत्रज्ञानाचा उपयोग केल्या जात आहे. त्यामुळे या बदलत्या युगात व स्पर्धेच्या काळात टिकायचे असेल तर सर्व ज्ञान आत्मसात करुन स्वतःला सिद्ध करने आवश्यक आहे, असे प्रदिपादन आरमोरी पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी नरेंद्र कोकडे यांनी केले. ते स्थानिक गट साधन केंद्र आरमोरी येथे १७ जानेवारीला स्टार्स प्रकल्पाअंतर्गत बीआरसी, सीआरसी आरमोरी व वडसा पंचायत समितीच्या सदस्यांची एक दिवसीय कार्यशाळा आयोजित करण्यात आले होते. यावेळी मार्गदर्शन करताना बोलत होते. या प्रसंगी मंचावर अध्यक्षस्थानी आरमोरी गटसाधन केंद्राचे गटसमन्वयक कैलास टेंभूर्णे तर प्रमुख अतिथी म्हणून वडसा गटसाधन केंद्राचे गटसमन्वयक संजय कसबे, वडसाचे केंद्रप्रमुख आनंद गुरनुले, कार्यशाळेचे सुलभक तथा तालुका समन्वयक डब्लूडझेड खेडकर, वडसा येथील तालुका समन्वयक तथा सुलभक अरविंद घुटके इ. मान्यवर उपस्थित होते.

कार्यशाळेत ऑनलाइन प्रशिक्षणादरम्यान प्रशिक्षणार्थ्यांना आलेल्या अडचणी व अनुभव तसेच सात घटकावर प्रत्येक घटक निहाय चर्चा करुन सुलभ करण्यात आले. त्याचप्रमाणे प्रशिक्षणाच्या सातही घटकावर प्रशिक्षणातून नव्याने प्राप्त झालेले ज्ञान, विकसीत झालेले कौशल्य, दृष्टीकोणात झालेला बदल हे उदिष्ट्ये साध्य करण्यासाठी गटकार्य घेण्यात आले. स्वाध्याय व प्रात्याक्षिक कार्याबाबत सुलभन करण्यात आले. या कार्यशाळेला आरमोरी व वडसा तालुक्यातील सर्व प्रशिक्षणार्थी शिक्षक उपस्थित होते.





  Print






News - Gadchiroli




Related Photos