महत्वाच्या बातम्या

 ज्ञानवंतांनी श्रमवंताशी साधलेला संवाद म्हणजे रासेयो शिबिर : उपाध्यक्ष अनिल स्वामी


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / जिबगाव (सावली) चंद्रपूर : राष्ट्रपिता महात्मा गांधी महाविद्यालय सावली व ग्रामपंचायत जिबगावच्या वतीने आयोजित राष्ट्रीय सेवा योजना शिबिराचा उद्घाटनीय सोहळा जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा जिबगाव येथे पार पडला. या सोहळ्याच्या अध्यक्ष स्थानावरून बोलताना भारत शिक्षण प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष अनिल स्वामी यांनी राष्ट्रीय सेवा योजना शिबिर हे ज्ञानवंतांनी श्रमवंताशी साधलेला संवाद असून रासेयो शिबिराच्या माध्यमातूनन सेवेचे ब्रीद स्वयंसेवकांच्या मनावर बिंबवल्या जात असून यावे ज्ञानासाठी व निघावे सेवेसाठी ही युक्ती या शिबिराच्या माध्यमातून खरी ठरते, असे विचार मांडले. यावेळी उद्घाटक म्हणून जिबगाव ग्रामपंचायत सरपंच पुरुषोत्तम चुदरी यांनी राष्ट्रीय शिबिराच्या माध्यमातून गावाच्या विकासाला हातभार लागेल असा विश्वास व्यक्त केला. याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अशोक खोब्रागडे, ग्रा. प‌‌‌. सदस्य राकेश गोलेपल्लीवार, जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक एस. वायकोर ग्रामपंचायतचे सचिव आशिष आकनुरवार आदी मान्यवर उपस्थित होते. १६ ते २२ जानेवारी या सात दिवशीय शिबिराचा उद्घाटन सोहळा उत्साहात पार पडला. उद्घाटनीय सोहळ्याचे प्रास्ताविक राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ. रामचंद्र वासेकर यांनी केले. संचालन प्रांजली दंडावर तर आभार सोनम कंकलवार हिने मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ. दिलीप कामडी, प्रा. स्मिता राऊत महाविद्यालयातील प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवक व जिबगाव ग्रामवासी यांचे सहकार्य लाभले. 





  Print






News - Chandrapur




Related Photos