ग्रामीण भागातील विद्यार्थी झाले 'शिक्षणापासून' कोसो दूर


विदर्भ न्यूज एक्स्प्रेस 
प्रतिनिधी / जारावंडी (मुकेश कावळे) :
कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर शाळा, विद्यालये बंद ठेवण्यात आले आहेत. अश्यात पालक विद्यार्थ्यांना शाळेत पाठविण्यास तयार नसल्याने शासनाने मुलांसाठी ऑनलाईन शिक्षण सुरू केले आहे. परंतु अनेक विद्यार्थ्यांकडे साधे मोबाईल आहेत पण काहींकडे तेही नाहीत. ज्यांच्याकडे अ‍ॅण्ड्रॉईड मोबाईल आहेत, त्यांना परिसरात नेटची सुविधा नसल्याने नेटवर्क मिळत नाही. म्हणून परिसरातील विद्यार्थी शिक्षणापासून कोसो दूर झाले आहे. 
करोना विषाणूपासून मुलांना संसर्ग होऊ नये, यासाठी शासनाने शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. मुलांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून ऑनलाईन शिक्षण पध्दत सुरू केली आहे. परंतु याचा फक्त शहरी भागातीलच विद्यार्थ्यांना लाभ मिळत आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थी यापासून वंचित राहिल्याने त्या विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे. सध्या परिसरातून शाळेत जाणारे विद्यार्थी हे शेतकरी व गोरगरीब कुटुंबातील आहेत.
अशा विद्यार्थ्यांची संख्या जास्त असून ही मुले दुर्गम भागात राहत असल्याने अनेक ठिकाणी मोबाईल नेटवर्क मिळत नसल्याने सद्यस्थिती ग्रामीण भागातील विद्यार्थी हे शिक्षणापासून कोसो दूर गेल्याचे निदर्शनास येत आहेत. 
  Print


News - Gadchiroli | Posted : 2021-04-27


Related Photos