महत्वाच्या बातम्या

 आजचे दिनविशेष  


महत्वाच्या घटना (१८ जानेवारी )

१८ जानेवारी १७७८ : कॅप्टन जेम्स कूक हे हवाई बेटांवर पोचणारे पहिले युरोपियन ठरले.

१८ जानेवारी १९११ : युजीन बी. इलाय यांनी सॅन फ्रान्सिस्कोच्या बंदरात उभ्या असलेल्या यु. एस. एस. पेनसिल्व्हेनिया या जहाजावर विमान उतरवले. जहाजावर विमान उतरण्याचा हा पहिलाच प्रसंग होता.

१८ जानेवारी १९५६ : संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या वेळी मुंबईमध्ये गोळीबार. यात १० लोक ठार, २५० जखमी, दंगल वाढल्याने २४ तास कर्फ्यू लावण्यात आला.

१८ जानेवारी १९६४ : न्यूयॉर्क येथे वर्ल्ड ट्रेड सेंटरच्या इमारतीचे भूमिपूजन झाले.

१८ जानेवारी १९७४ : इजिप्त व इस्त्राएल यांच्यात शांतता करारावर सह्या झाल्या.

१८ जानेवारी १९९७ : नॉर्वेच्या बोर्ग औसलँडने एकट्याने अटलांटिक महासागर पार केला.

१८ जानेवारी १९९८ : मदनमोहन पूंछी यांनी भारताचे २८ वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.

१८ जानेवारी १९९९ : नोबेल पारितोषिक विजेते अर्थशास्त्रज्ञ अमर्त्य सेन यांना भारतरत्‍न हा सर्वोच्‍च नागरी सन्मान जाहीर.

१८ जानेवारी २००५ : एअरबस ए-३८० या जगातील सर्वात मोठ्या प्रवासी विमनाचे अनावरण करण्यात आले.

जन्म (१८ जानेवारी )

१८ जानेवारी १७९३ : महाराष्ट्रातील एक सद्गुणी, प्रजाहितदक्ष पण दुर्दैवी राजे प्रतापसिंह भोसले यांचे निधन. (मृत्यू: ४ ऑक्टोबर १८४७)

१८ जानेवारी १८४२ : न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांचा जन्म. (मृत्यू: १६ जानेवारी १९०९)

१८ जानेवारी १८५४ : अलेक्झांडर ग्रॅहम बेल यांचा मदतनीस तसेच त्यांचा पहिल्या दुरध्वनी संभाषणातील भागीदार थॉमस वाॅॅॅटसन यांचा जन्म.

१८ जानेवारी १८८९ : नाट्यछटाकार शंकर काशिनाथ गर्गे उर्फ दिवाकर यांचा जन्म. (मृत्यू: १ ऑक्टोबर १९३१)

१८ जानेवारी १८८९ : कन्नड कवी व विचारवंत देवनहळ्ळी वेंकटरामनय्या गुंडप्पा तथा डी. व्ही. जी. यांचा जन्म. (मृत्यू: ७ ऑक्टोबर १९७५ – बंगळुरू, कर्नाटक)

१८ जानेवारी १८९२ : अमेरिकन अभिनेता ऑलिव्हर हार्डी यांचा जन्म.

१८ जानेवारी १८३३ : अमेरिकन संशोधक रे डॉल्बी यांचा जन्म.

१८ जानेवारी १९३३ : भारताचे २७ वे सरन्यायाधीश जगदीश शरण वर्मा यांचा जन्म. (मृत्यू: २२ एप्रिल २०१३)

१८ जानेवारी १९५२ : चंदन तस्कर वीरप्पन यांचा जन्म. (मृत्यू: १८ ऑक्टोबर २००४)

१८ जानेवारी १९६६ : रशियन बुद्धिबळपटू अलेक्झांडर खलिफमान यांचा जन्म.

१८ जानेवारी १९७२ : भारतीय क्रिकेटपटू विनोद कांबळी यांचा जन्म.

१८ जानेवारी १९९५ : साहित्यिक, कवी आणि शिक्षणतज्ज्ञ वि. द. घाटे यांचा जन्म.

मृत्यू (१८ जानेवारी )

१८ जानेवारी १९३६ : नोबेल पारितोषिक विजेते ब्रिटिश लेखक रुडयार्ड किपलिंग यांचे निधन. (जन्म: ३० डिसेंबर १८६५)

१८ जानेवारी १९४७ : भारतीय अभिनेता आणि गायक के. एल. सैगल उर्फ कुंदनलाल सैगल यांचे निधन. (जन्म: ११ एप्रिल १९०४)

१८ जानेवारी १९६७ : कृषितज्ज्ञ डॉ. पांडुरंग सदाशिव खानखोजे यांचे निधन.

१८ जानेवारी १९७१ : भारीतय वकील आणि संसद सदस्य बॅरीस्टर नाथ पै यांचे निधन.

१८ जानेवारी १९९३ : कृतिशील विचारवंत, मराठा चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज चे संस्थापक आत्माराम रावजी भट यांचे निधन. (जन्म: १२ मे १९०५)

१८ जानेवारी १९९६ : अभिनेते आणि राजकीय नेते एन. टी. रामाराव यांचे निधन. (जन्म: २८ मे १९२३)

१८ जानेवारी २००३ : हिंदी साहित्यिक आणि कवी हरिवंशराय बच्चन यांचे निधन. (जन्म: २७ नोव्हेंबर १९०७)





  Print






News - todayspecialdays




Related Photos