ऐन दिवाळीत बँकांना सलग पाच दिवस सुट्ट्या, नागरिकांची गैरसोय होण्याची शक्यता


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली :
  ऐन दिवाळीत बँकांना पाच दिवस सुट्ट्या असल्याने नागरिकांची गैरसोय होण्याची शक्यता आहे.  ७ नोव्हेंबर रोजी लक्ष्मीपूजन, गुरुवारी ८ नोव्हेंबर रोजी दिवाळी पाडवा आणि त्यानंतर शुक्रवारी ९ तासखेला भाऊबीज असल्याने बँका बंद असतील. तर १० तारखेला दुसरा शनिवार असल्याने बँकेला सुट्टी आहे. त्यानंतर ११ नोव्हेंबरला रविवार असल्याने पुन्हा बँका बंद असतील. त्यामुळे  काही महत्त्वाची कामे असल्यास ती आताच करुन घ्यावीत. अन्यथा दिवाळीनंतर बँकांमध्ये एकच गर्दी होण्याची शक्यता आहे. 
दरम्यान बँकांना सलग ५ दिवस सुट्टी असल्याने एटीएममध्येही खडखडाट होऊ शकतो. त्यामुळे एटीएममधूनही रक्कम  वेळीच काढून ठेवायला हवेत असे सांगण्यात येत आहे. वैद्यकीय किंवा इतर तातडीच्या खर्चांसाठी लागणाऱ्या पैशांची आधीच तजवीज केल्यास ऐन दिवाळीच तुम्हाला आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागणार नाही.   Print


News - Gadchiroli | Posted : 2018-10-27


Related Photos