प्रशासनाच्या विरोधात पानठेला धारकांचा पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन


- रोजगार द्या मगच पानठेले बंद करा 
- पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल 
विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली :
जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार  नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांकडून गडचिरोली शहरातील पानठेले धारकांना २५ ऑक्टोबर रोजी पानठेले हटवा अन्यथा जे.सी.बी. लावून पानठेले हटवू असे धमकीवजा नोटीस दिली. तसेच पानठेला व्यावसायिकांवर दंडात्मक कारवाईचा बडगा उगारला आहे. त्याच्या विरोधात आज शहरातील पानठेला धारकांनी आरमोरी मार्गावरील पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन सुरु करून प्रशासनाचे लक्ष वेधले आहे . घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी विशाल ढुमे, पोलीस निरीक्षक गायकवाड पथकासह दाखल झाले आहेत . 
नगर परिषदेने पानठेला व्यावसायिकांवर दंडात्मक कारवाईचा बडगा उचलला यामुळे चार ते पाच दिवसांपासून पानठेले बंद असून कुटुंबियांवर उपासमारीचे संकट आले आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या पानठेला धारकांनी आज चक्क पाण्याच्या टाकीवर चालून चढून रोजगार उपलब्ध करून दिल्यावरच पानठेले बंद करावे अशी मागणी करीत प्रशासनाच्या विरोधात घोषणाबाजी सुरु केली आहे . सलग २ तासांनंतर सुद्धा आंदोलनकर्ते मागे न हटता आंदोलन सुरु ठेवले आहे .इंदिरा गांधी चौकात आंदोलन बघ्यांची गर्दी उसळत आहे . प्रशासनाचे कर्मचारी व पोलीस अधिकारी सुद्धा दाखल झाले आहेत. आता प्रशासन काय उपाययोजना करतात याकडे सर्वांचेस लक्ष लागले आहेत . 
 गडचिरोली जिल्हा हा उद्योग विरहित जिल्हा आहे. येथे कारखाने किंवा उद्योगधंदे नाहीत. तसेच सरकारी नौकऱ्या नाहीत. जिल्ह्यातील अनेक बेरोजगार चहाची दुकाने, पानठेले, कटलरी असे छोटे मोठे धंदे टाकून आपल्या कुटुंबाची पत्नी, मुले, म्हातारे आई वडील यांचा पालनपोषण करीत आहे व मुलामुलींचे शिक्षण पूर्ण करीत आहेत. परंतु दरवर्षीप्रमाणे यावर्षात सुद्धा तंबाखू नियंत्रण कायदा २००३ (COTPA) या कायद्याचे कारण  पुढे ठेवून नगर परिषद गडचिरोली कडून  कारवाई केली जात आहे. यामुळे पानठेलेधारक धास्तावून गेले आहेत. त्यांचा रोजगार हिरावून घेण्यात आला आहे . 
 तंबाखूचे होलसेल दुकान जिथून पुरवठा होते ते बंद करावे किंवा कारखाने बंद करावे. गरीब , छोट्या उद्योजकांना शासकीय अधिकाराचा दुरुपयोग करून कारवाई करू नये, या मागणीसाठी पानठेला धारकांनी आंदोलनाचा पवित्रा घेत पाण्याच्या टाकीवर चढून प्रशासनाचे लक्ष वेधले आहे. आता प्रशासना कडून  काय उपाययोजना केल्या जातात याकडे सर्वांचेस लक्ष लागले आहेत .   Print


News - Gadchiroli | Posted : 2018-10-27


Related Photos