अनिल देशमुखांविरोधात सीबीआय ने दाखल केला एफआयआर : १०० कोटी खंडणी प्रकरणात कारवाई


विदर्भ न्यूज एक्स्प्रेस 
वृत्तसंस्था / मुंबई :
महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे. अनिल देशमुख यांच्याविरोधात सीबीआय ने एफआयआर दाखल केला आहे. खंडणी प्रकरणात सीबीआयने देशमुखांविरोधात एफआयआर दाखल केला आहे. प्राथमिक चौकशी करण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने सीबीआयला दिले होते. त्यानंतर सीबीआयने ही कारवाई केली आहे. अनिल देशमुखांच्या नागपूर आणि काटोल याठिकाणी असणाऱ्या घरांवर सीबीआयने छापेमारी केल्याची देखील माहिती समोर आली आहे. वरळी येथील सुखदा इमारतीत अनिल देशमुख यांचे घर आहे, त्या ठिकाणीही छापा घालण्यात आला आहे. 
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परम बीर सिंग यांनी केलेल्या आरोपाप्रकरणी सीबीआयने महाराष्ट्रचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि इतरांविरूद्ध एफआयआर दाखल केला आहे. याप्रकरणी सीबीआयची विविध ठिकाणी शोधमोहीम सुरू आहे.
  Print


News - Rajy | Posted : 2021-04-24


Related Photos